16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ज्या घरात राहत होती त्याच नराधमाने... डोंबिवलीतील मुलीनं धाडस करत डोकं लावलं अन्...

Dombivali news :  डोंबिवलीत एका 16 वर्षीय अल्पवयीन तिच्याच घरात राहणाऱ्या आरोपीकडून अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता. आरोपी इकबाल अन्सारीला रामनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला

Dombivali news

Dombivali news

मुंबई तक

• 04:19 PM • 15 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

डोंबिवलीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर विनयभंग

point

आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Dombivali News : डोंबिवलीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच घरात राहणाऱ्या आरोपीकडून अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला होता.  आरोपीवर रामनगर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून संबंधित गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेनं डोंबिवली शहर हादरून गेलं आहे. या प्रकरणात इकबाल नन्हेबक्ष अन्सारी (वय 37) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याने जबरदस्ती तरुणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : जालना जिल्ह्यातील पाझर तलावात दोघेही भाऊ पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात बुडून...

एकूण प्रकरण काय? 

अन्सारीच्या या विकृत कृत्याला भयभीत न होता पीडितेनं धाडस दाखवून परिस्थितीला घाबरून न जाता, त्या अल्पवयीन मुलीने जीवाची बाजी लावत तिच्यावरील आलेला अतिप्रसंग उधळवून लावण्याचा प्रयत्न केला. तिने नराधमाला जोरदार विरोध करत त्याच्या तावडीतून स्वत:ची सुटका केली आणि नंतर आरडाओरड केली. त्यानंतर तातडीने या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना देण्यात आली आहे. 

पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली 

संबंधित घटनेची माहिती पोलिसांना मिळताच रामनगर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. पीडितेनं दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आरोपी इकबाल नन्हेबक्ष अन्सारी याचा शोध घेण्यास सुरुवात केली. तेव्हा पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीला डोंबिवलीतील आयरे गावातून ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी नराधमाविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करत रामनगर पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. 

हे ही वाचा : मराठा आरक्षण टिकेल की नाही? बीडच्या मराठा बांधवाने उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

दरम्यान, घटनास्थळावरील परिसरात संतापाचे वातावरण दिसून आले होते. या प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केल्याचं बोललं जातंय. 

    follow whatsapp