अंतवस्त्रात 6 किलो सोनं ठेवलं, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पोहोचले, गुप्तचर यंत्रणेला कुणकुण लागली अन्...

मुंबई तक

29 Nov 2025 (अपडेटेड: 29 Nov 2025, 09:06 AM)

Gold smuggling case : अंतवस्त्रात 6 किलो सोनं ठेवलं, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पोहोचले, गुप्तचर यंत्रणेला कुणकुण लागली अन्...

Gold smuggling case

Gold smuggling case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

अंतवस्त्रात 6 किलो सोनं ठेवलं, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात पोहोचले,

point

गुप्तचर यंत्रणेला कुणकुण लागली अन्...

Gold smuggling case, मुंबई : सोन्याची तस्करी रोखण्यासाठी केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेने (डीआरआय) आणखी एक महत्वाची कारवाई केली आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल परिसरात दोन तरुणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल सहा किलो बेकायदेशीर सोने जप्त करण्यात आले आहे. हे सोने त्यांनी आपल्या अंतर्वस्त्रामध्ये अत्यंत कौशल्याने लपवून ठेवले होते. जप्त केलेल्या सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 7 कोटी 40 लाख रुपये इतकी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हे वाचलं का?

या प्रकरणात मोहम्मद सातिक आणि कलंदर अझरुद्दीन या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही साधारण 25 वर्षांचे तरुण असल्याचे समोर आले आहे. सोन्याच्या तस्करीच्या या रॅकेटमध्ये दोघांची भूमिका काय होती, तसेच ते कोणाकडे सोने सुपूर्द करणार होते, याबाबतचा तपास सध्या सुरू आहे.

हेही वाचा : विकृत भेळपुरीवाल्याचं महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, गर्लफ्रेंडच्याच 13 वर्षीय चिमुरडीवर वर्षभर नको तेच केलं...

डीआरआय अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ दोन जण तस्करी केलेले सोने देण्यासाठी येणार आहेत. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या परिसरात पाळत ठेवत एक विशेष सापळा रचला. ठरलेल्या वेळेनुसार संशयित दोघेही स्टेशनजवळ पोहोचताच त्यांना थांबवून चौकशी करण्यात आली. अधिकाऱ्यांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तपासणी करण्यात आली असता दोघांनीही अंतर्वस्त्रामध्ये मोठ्या कौशल्याने लपवलेले सोन्याचे पॅकेट आढळून आले. त्यानंतर त्यांना तत्काळ ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात सोन्याचा स्त्रोत, तस्करीची पद्धत, तसेच मागील रॅकेटशी असलेले संबंध याचा तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे मुंबईत सुरू असलेल्या बेकायदेशीर सोन्याच्या वाहतुकीवर आणखी एक मोठा आघात केला असल्याचे डीआरआय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच या प्रकरणात आणखी कोण सामील आहे का, याबाबत चौकशी वेगाने करण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

विकृत भेळपुरीवाल्याचं महिलेसोबत लिव्ह इन रिलेशनशिप, गर्लफ्रेंडच्याच 13 वर्षीय चिमुरडीवर वर्षभर नको तेच केलं...