Govt Jobs : इंडियन ऑईलमध्ये विविध पदांसाठी भरती, 50 हजार रुपयांपर्यंत वेतन

मुंबई तक

• 04:19 PM • 28 Aug 2026

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, वेतन किती आहे हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा.

IOCL Recruitment 

IOCL Recruitment 

Google CTA

बातम्या हायलाइट

point

इंडियन ऑईलमध्ये विविध पदांसाठी भरती

point

50 हजार रुपयांपर्यंत वेतन

IOCL Recruitment : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने विविध पदांच्या भरतीसाठी 470 रिक्त जागांवर अर्ज मागवले आहेत. यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया 14 ऑगस्ट 2026 रोजी सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 सप्टेंबर 2026 आहे. या भरतीअंतर्गत 5 वेगवेगळ्या कार्यकारी पदांवर नियुक्त्या केल्या जाणार असून, यासाठीची संभाव्य संगणक आधारित परीक्षा (CBT) 22 सप्टेंबर रोजी घेतली जाण्याची शक्यता आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रति अर्ज एक हजार रुपये आणि त्यावर लागू असणारा जीएसटी शुल्क भरावा लागणार असून, निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिमहा 30 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत मूळ वेतन दिले जाईल.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता काय?

या भरती प्रक्रियेत पदवीधर अभियंता, अधिकारी (विपणन), कायदा अधिकारी, साहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि पदविका अभियंता अशा पाच प्रमुख पदांचा समावेश आहे. पदवीधर अभियंता (ग्रेड ए) पदासाठी मान्यताप्राप्त संस्थेची संबंधित शाखेतील बी.ई. किंवा बी.टेक. पदवी असणे आवश्यक असून, विपणन अधिकाऱ्यासाठी 60 टक्क्यांसह एमबीए किंवा पीजीडीबीए पदव्युत्तर पदवी अनिवार्य आहे. कायदा अधिकाऱ्यासाठी एलएलबी पदवीसह दोन वर्षांचा कामाचा अनुभव मागितला असून, साहाय्यक गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यासाठी रसायनशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि दोन वर्षांचा संबंधित प्रयोगशाळेचा अनुभव असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

हे ही वाचा : जळगाव : पहाटे घराबाहेर पडले अन् रेल्वेखाली झोकून दिले; दोन मुलांसह दाम्पत्याची आत्महत्या

पदवीकाधाकरांना संधी

तसेच पदविका अभियंता (ग्रेड ई०) पदासाठी संबंधित शाखेतील तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा इंजिनीअरिंग) 65 टक्क्यांपर्यंत गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर सुरक्षा शाखेसाठी अतिरिक्त औद्योगिक सुरक्षा पदविकेची अट ठेवली आहे. या पदासाठी अभियांत्रिकी पदवी, एमबीए किंवा पीएचडीसारख्या उच्च व्यावसायिक पदव्या धारण केलेले उमेदवार पात्र ठरणार नाहीत, ज्यामुळे केवळ पदविकाधारकांनाच यात संधी मिळणार आहे. सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 26 ते 30 वर्षे निर्धारित करण्यात आली आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात शिथिलता देण्यात येईल.

हे ही वाचा : CJP राजकारणात आल्यास किती टक्के Gen-Z तरुणाई थेट पाठिंबा देणार?

'असा' करा अर्ज

पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच 3 सप्टेंबरच्या आत आयओसीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.iocl.com) जाऊन आपले अर्ज सादर करणे गरजेचे आहे. अर्जातील पात्रता निकष, शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनाच परीक्षेसाठी प्रवेश दिला जाईल. परीक्षा, प्रवेशपत्र आणि भरती प्रक्रियेच्या पुढील टप्प्यांची सर्व माहिती अधिकृत पोर्टलवर वेळोवेळी अपडेट केली जाणार असल्याने उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.