Maharashtra Board HSC Result 2025: 12 वीच्या निकालाची तारीख लवकरच, रोल नंबर 'असा' करा डाऊनलोड

मुंबई तक

• 05:58 PM • 02 May 2025

HSC Result 2025 Roll Number Download :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेली बारावीची परीक्षा मार्च महिन्यात पार पडली.

HSC Result 2025 Roll Number Download

HSC Result 2025 Roll Number Download

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बारावीचा निकाल कधी लागणार?

point

कसा कराल रोल नंबर डाऊनलोड?

point

'या' वेबसाईट्सवर बारावीचा निकाल पाहू शकता

HSC Result 2025 Roll Number Download :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेली बारावीची परीक्षा मार्च महिन्यात पार पडली. गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत. या परीक्षेच्या उत्तर पत्रिका तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेचा निकाल 15 मे पर्यंत घोषित केला जाऊ शकतो. राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना बारावीच्या निकालाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. परंत,बोर्डाकडून एचएससीच्या निकालाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना रोल नंबर कसा डाऊनलोड करावा, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 

हे वाचलं का?

बारावीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या रोल नंबरची आवश्यकता लागणार आहे. विद्यार्थ्यांसाठी रोल नंबर ऑनलाईन जाहीर केले, तर ते कसे डाऊनलोड करायचे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. दरम्यान, बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाईटवर mh-hsc.ac.in माहिती भरू शकतात आणि त्यानंतर आपला रोल नंबर डाऊनलोड करू शकतात. 

हे ही वाचा >> पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज; बीडच्या पोराला पुण्यात पकडलं, प्रकरण नेमकं काय?

कसा कराल रोल नंबर डाऊनलोड?

  1. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईट mh-hsc.ac.in वर लॉग इन करावं.
  2. आवश्यक ती माहिती या वेबसाईटवर भरा.
  3. तुमचं पूर्ण नाव टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
  4. तुमचा रोल नंबर स्क्रीनवर येईल. त्यानंतर तुम्ही तो डाऊनलोड करू शकता. 

'या' वेबसाईट्सवर बारावीचा निकाल पाहू शकता

  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in
  • sscresult.mkcl.org
  • hsc.mahresults.org.in

कशी असेल ग्रेडिंग सिस्टम?

  • 75 टक्के आणि त्यापुढे – Distinction
     
  • 60 टक्के आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)
  • 45 टक्के to 59 टक्के – द्वितीय श्रेणी (Second Class)
  • 35 टक्के to 44 टक्के – उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)
  • 35 टक्के पेक्षा कमी – अनुत्तीर्ण (Fail)

हे ही वाचा >> आईच्या डोळ्यादेखत 11 महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून नेलं; 36 तासांच्या शोधमोहिमेनंतर थेट...