Navi Mumbai Murder Case Update : नवी मुंबईत उल्वे येथे मास्क घालून आलेल्या एका व्यक्तीने 27 वर्षीय महिलेची भर रस्त्यात हत्या केली. या घटनेच्या दोन दिवसानंतर पनवेल क्राईम ब्रान्च पोलिसांनी हत्या झालेल्या महिलेच्या पतीला अटक केली. पत्नीची हत्या करण्यासाठी आरोपी पतीने 6 लाखात सुपारी दिली होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या हत्या प्रकरणात दोन अन्य आरोपी अलीशा त्यागी (38) उत्तरप्रदेश, चरणजीत कौर उर्फ डिंपल (34) पंजाबहून अटक केली आहे. दोन अन्य आरोपी सुखप्रीत राठिया आणि गुरप्रीत राठिया फरार आहेत. दोघेही पंजाबचे रहिवासी आहेत.
ADVERTISEMENT
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जून राज यांनी दिलेली माहिती अशी की, किशोर सिंह राजपूत (30) आणि अलविना किशोर सिंह यांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, अलविनाने घटस्फोट देण्याआधी पैशांची मागणी केली. किशोरने त्याच्या पत्नीला काही पैसे दिले. पण अलविनाने जास्त पैशांची मागणी केली. पत्नीच्या पैशांच्या मागणीमुळे वैतागलेल्या पती किशोरने तिची हत्या केली. किशोर सिंह राजपूतने अलिवानाची हत्या करण्यासाठी शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अलीशा त्यागीला 6 लाखांची सुपारी दिली होती.
हे ही वाचा >> Pune Crime : 'पांढऱ्या पायाची, जा तुझ्याबापाकडून कार...' वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण
अलीशाने 6 लाखात घेतली हत्येची सुपारी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीशा त्यागीने अलविनाची हत्या करण्यासाठी तिची मोलकरीण चरणजीत कौरची मदत घेतली. चरणजीतने या कामात मदत करण्यासाठी गृहनगर येथील सुखप्रीत आणि गुरप्रीतला सामील केलं. उल्वे सेक्टर 5 मध्ये विजय लक्ष्मी टॉवरपासून फक्त 50 मीटर अंतरावर असलेल्या रेडिएन्स स्प्लेंडर बिल्डिंग अलविनावर पाठीमागून मास्क लावलेल्या व्यक्तीने हल्ला केला. अलविनाचा गळा चिरून हत्या करण्यात आली.
हे ही वाचा >> मुंबईतील Spa मध्ये मसाज नाही तर चक्क वेश्या व्यवसाय सुरू होता...असा झाला पर्दाफाश
किशोर-अलविनाने 2021 मध्ये केलं होतं लव्ह मॅरेज
किशोर आणि अलविनाने 2021 मध्ये प्रेमविवाह केला होता. परंतु, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले. पती-पत्नी दोघेही फार्मसिस्ट होते आणि उलव्यात मेडिकल चालवत होते. मेडिकल सुरु करण्यासाठी अलविनाने किशोरला 15 लाख रुपये दिले होते. घटस्फोटाच्या मागणीनंतर अलविना हेच पैसे किशोरकडून पुन्हा परत घेत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, किशोर घटस्फोटासाठी अलविनावर दबाव टाकत होता. पण अलविना त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. त्यामुळे किशोरने अलविनाचा खून केला.
ADVERTISEMENT
