मुंबईतील Spa मध्ये मसाज नाही तर चक्क वेश्या व्यवसाय सुरू होता...असा झाला पर्दाफाश

मुंबई तक

मुंबईतील स्पामधील वेश्या व्यसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी स्पाच्या मालकाला अंबोली पोलिसांकडून ताब्यात घेतलं आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील Spa मध्ये मसाज नाही तर चक्क वेश्या व्यवसाय सुरू होता
मुंबईतील Spa मध्ये मसाज नाही तर चक्क वेश्या व्यवसाय सुरू होता
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील Spa मध्ये चक्क वेश्या व्यवसाय

point

स्पामधील वेश्या व्यसायाचा पर्दाफाश

point

पोलिसांच्या टीमने घटना उघडकीस आणली

Mumbai Crime News: वेश्या व्यवसाया संबंधी बऱ्याच घटना आणि गुन्हे घडत असल्याचे आपण ऐकतो. मुंबईतील एका स्पामध्ये सुद्धा अशीच घटना घडल्याचं समोर आलंय. ओशिवरा येथील रामशा स्पामध्ये मागील वर्षाभरापासून देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. आता पोलिसांनी या आरोपाखाली एका 51 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. 

ज्या स्पामध्ये गेल्या वर्षभरापासून हा गैरप्रकार सुरू होता, त्या स्पाच्या मालकाचं नाव शोमा मुखर्जी असून तो त्याचं वय 51 वर्षे असल्याचं समोर आलं आहे. हे रामशा नावाचं स्पा ओशिवरा मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या क्रिस्टल प्लाझामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. 

हे ही वाचा: महाराष्ट्र हादरला! कोल्ड ड्रिंक्समध्ये औषध टाकलं, दारू पाजली..नराधमांनी MBBS विद्यार्थीनीसोबत केला गँगरेप

पोलिसांच्या टीमच्या प्लॅनिंगमुळे घटनेचा खुलासा 

याबद्दल अंबोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला रामशा स्पामध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांच्या टीमने घटनास्थळी म्हणजेच स्पामध्ये पोलीस खात्यातील एका अधिकाऱ्याला ग्राहक बनवून पाठवले आणि त्यावेळी तिथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उघडकीस आलं. यामुळे गुरुवारी रात्रीच्या वेळीस स्पावर छापा टाकण्यात आला. यादरम्यान, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकाच्या रहिवासी असलेल्या तीन महिलांची तिथुन सुटका करण्यात आली. 

हे ही वाचा: Pune Crime : 'पांढऱ्या पायाची, जा तुझ्याबापाकडून कार...' वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण

पोलीस चौकशीत आलं समोर 

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्यवसाय चालवणाऱ्या स्पाच्या मालकाला ताब्यात घेतलं आहे. या संबंध प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली. चौकशीदरम्यान ही स्पाची जागा मालकाने भाड्यावर घेतली असल्याचं समोर आलं. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp