Mumbai Local : तीन रेल्वे कर्मचाऱ्यांना लोकलने चिरडले, मृत्यू झालेले कोण होते?

पालघर जिल्ह्यातील वसईजवळ लोकल ट्रेनच्या धडकेत पश्चिम रेल्वेच्या तीन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी सिग्नलशी संबंधित समस्या सोडवत होते. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.

In Mumbai Western Local Accident 3 Railway Employees Died At Palghar Vasai

In Mumbai Western Local Accident 3 Railway Employees Died At Palghar Vasai

रोहिणी ठोंबरे

• 10:49 AM • 23 Jan 2024

follow google news

In Mumbai Local Accident 3 Railway Employees Died : पालघर जिल्ह्यातील (Palghar District) वसईजवळ लोकल ट्रेनच्या (Local Train) धडकेत पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) तीन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे कर्मचारी (Railway Employee) सिग्नलशी संबंधित समस्या सोडवत होते. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी (23 जानेवारी) ही माहिती दिली. (In Mumbai Western Local Accident 3 Railway Employees Died At Palghar Vasai)

हे वाचलं का?

सरकारी रेल्वे पोलीस (GRP) अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री 8.55 वाजता वसई रोड आणि नायगाव स्थानकादरम्यान घडली. लोकत ट्रेन चर्चगेटच्या दिशेने जात होती.

वाचा : Uddhav Thackeray : ‘तुमचा राजकीय बाप…’, श्यामा प्रसाद मुखर्जींचं नाव घेत ठाकरेंनी भाजपला सुनावलं

मुख्य सिग्नल निरीक्षक (भाईंदर) वासू मित्रा, इलेक्ट्रिकल सिग्नल मेंटेनर (वसई रोड) सोमनाथ उत्तम लांबुत्रे आणि मदतनीस सचिन वानखडे अशी या मृत रेल्वे कर्मचाऱ्यांची नावं आहेत. हे सर्व कर्मचारी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सिग्नल विभागातील होते.

अधिकाऱ्याने सांगितले की, कर्मचारी सोमवारी (22 जानेवारी) संध्याकाळी काही सिग्नल पॉइंट्सच्या दुरुस्तीसाठी गेले होते. पश्चिम रेल्वेने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसंच, मृत रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत म्हणून ५५ हजार रूपयांची मदत दिली जाणार आहे.

वाचा : Ram Mandir : कपाळी टिळा, रत्नजडित दागिने… रामलल्लाच्या अलौकिक श्रृंगाराचे वैशिष्ट्य काय?

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मुंबईच्या शिवडी स्थानकावर लोकल ट्रेनच्या दोन बोगींमधील गॅपमध्ये पडल्याने एका दृष्टिहीन महिलेचा चिरडून मृत्यू झाला होता. ऑगस्टमध्ये, मुंबईच्या सायन स्थानकावर अविनाश माने आणि त्याची पत्नी शीतल माने यांच्याशी झालेल्या भांडणानंतर दिनेश राठोड या 26 वर्षीय युवकाचा तोल गेला आणि तो रुळावर पडला. त्यानंतर समोरून येणाऱ्या रेल्वेने चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

    follow whatsapp