'भिकारी' म्हणून प्रशासनाने फोटो व्हायरल केले, पण 'त्या' कुष्ठरोग असलेल्या वृद्धाचे नातेवाईक कोट्याधीश

Indore Crorepati Bhikari : काही दिवसांपूर्वी इंदौरच्या शहर प्रशासनाने 'भिकारीमुक्त शहर' हे अभियान सुरु केलं होतं. त्यानंतर मांगीलाल हा वृद्ध भिकारी राहिला नाही, अशी जाहिरात प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र या जाहिराती पाहिल्यानंतर संबंधित वृद्धाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.

Indore Crorepati Bhikari

Indore Crorepati Bhikari

मुंबई तक

20 Jan 2026 (अपडेटेड: 20 Jan 2026, 12:25 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

इंदौरमधील एक भिकारी करोडपती असल्याची माहिती समोर आली होती.

point

प्रकरणाने घेतले वेगळे वळण

point

नातेवाईकांचा वेगळाच दावा

Indore Crorepati Bhikari : काही दिवसांपूर्वी इंदौरच्या शहर प्रशासनाने 'भिकारीमुक्त शहर' हे अभियान सुरु केलं होतं. त्यानंतर मांगीलाल हा वृद्ध भिकारी राहिला नाही, अशी जाहिरात प्रशासनाकडून करण्यात आली होती. मात्र या जाहिराती पाहिल्यानंतर संबंधित वृद्धाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मांगीलाल हे भिकारी नसून आमच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे, असं नातेवाईकांनी सांगितलं. यानंतर प्रशासनावर या प्रकरणाचा खुलासा करण्याची वेळ आली. नेमकं प्रकरण काय आहे, समजून घेऊया.

हे वाचलं का?

हे ही वाचा : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा हृदयविकाराने मृत्यू

मांगीलालकडे आहे करोडोंची संपत्ती

मांगीलालकडे करोडो रुपयांची संपत्ती असल्याचा दावा इंदौर प्रशासनाने केला होता. त्यानुसार, त्याच्याकडे तीन पक्की घरं, तीन ऑटो रिक्षा आणि एक कार असल्याचं प्रशासनानं सांगितलं होतं. तीन घरांपैकी एक तीन मजली इमारत आहे. तसेच रिक्षा भाड्याने चालवण्यासाठी दिल्या आहेत आणि कारवर एक ड्रायव्हर ठेवला आहे. यानंतर सबंध देशभरात मांगीलालची चर्चा सुरु झाली होती.

'मी भिकारी नाही' 

मांगीलालविषयी सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु झाली होती. त्याचा एक फोटोही व्हायरल झाला होता. मांगीलाल हा दिव्यांग असल्याने त्याला चालता येत नाही. यासाठी तो चाक असलेली फळी वापरतो. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याचे कुटुंबिय समोर आले असून मांगीलाल भिकारी नसल्याचे त्याच्या पुतण्याने सांगितले आहे. पुतण्याने दिलेल्या माहितीनुसार, मांगीलाल एका आश्रयगृहात राहतात. ते मार्केचमध्ये भीक मागण्यासाठी नाही, तर व्याजाने दिलेले पैसे परत मागण्यासाठी जात होते. तीन मजली इमारत ही माझ्या आईच्या नावावर आहे. इतर घरांचा कोर्टात खटला चालू आहे.

हे ही वाचा : "लोकांच्या समस्या सोडवण्यास जायला हवं होतं, पण नगरसेवक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ‘आनंदाने’ कैद"

एनजीओ म्हणते, मांगीलाल भिकारीच

इंदौरमधील भिक्षा निर्मूलनासाठी काम करणाऱ्या एनजीओच्या अध्यक्षा रुपाली जैन यांनी मांगीलाल भिकारीच असल्याचे सांगितले आहे. काही वर्षांपूर्वी मांगीलाल गवंडीकाम करायचे. मात्र कुष्ठरोगानंतर त्यांना काम करणे शक्य झाले नाही. कुटुंबाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी भीक मागायला सुरुवात केल्याचे जैन यांनी सांगितले. तसेच मांगीलालने भीक मागून करोडोंची संपत्ती जमवली असण्याची शक्यता नाही. मात्र गेल्या चार वर्षात भीक मागणे सोडावे यासाठी आम्ही त्यांना समजावल्याचंही जैन म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश इंदौर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

    follow whatsapp