कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा हृदयविकाराने मृत्यू

मुंबई तक

Govind Pansare murder case : सोमवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. समीर गायकवाड यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी धडकताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ADVERTISEMENT

Govind Pansare
Govind Pansare
social share
google news

बातम्या हायलाइट

point

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा हृदयविकाराने मृत्यू

point

आरोपी समीर गायकवाडचा ह्रदयविकाराचा मृत्यू

Govind Pansare murder case : कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड यांचा आज सकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. समीर गायकवाड हा चार वर्षांपूर्वी गोविंद पानसरे हत्या प्रकरणातुन जामिनावर बाहेर आला होता. गेली चार वर्ष तो सांगलीतील विकास चौक परिसरातील आपल्या घरी राहात होता. सोमवारी (दि.19) मध्यरात्रीच्या सुमारास त्याला त्रास जाणवू लागल्याने त्याला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. समीर गायकवाड यांच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी धडकताच कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : प्रेम विवाह केला पण पत्नीचे इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या 4 महिन्यांनंतर गळा दाबून संपवलं

कॉम्रेड गोविंद पानसरे हे डाव्या चळवळीतील विचारवंत होते. 16 फेब्रुवारी 2015 रोजी कोल्हापूरमध्ये सकाळच्या फेरफटक्यानंतर घरी परतत असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात पानसरे गंभीर जखमी झाले होते, तर त्यांच्यासोबत असलेल्या उमाताई पानसरे यांनाही दुखापत झाली होती. उपचार सुरू असतानाच 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोविंद पानसरे यांचे निधन झाले.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान विशेष तपास पथकाने (एसआयटी) डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना अटक केली होती. मात्र, या तपासाबाबत पानसरे कुटुंबीयांनी असमाधान व्यक्त करत एसआयटीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला होता. तसेच, हा तपास एटीएसकडे वर्ग करावा, अशी मागणी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर सुनावणी करत 2022 मध्ये उच्च न्यायालयाने या हत्याप्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवण्याचे आदेश दिले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp