"लोकांच्या समस्या सोडवण्यास जायला हवं होतं, पण नगरसेवक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ‘आनंदाने’ कैद"

मुंबई तक

Amit Thackeray Facebook Post : महायुतीत महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिंदेंच्या नगरसेवकांना वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. मात्र, शिदेंनी मार्गदर्शनासाठी सर्वांना एकत्र ठेवण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, याबाबत आता मनसे नेते अमित ठाकरेंनी फेसबुक पोस्ट केलीये. अमित ठाकरे नेमंक काय म्हणाले? जाणून घेऊयात.. 

ADVERTISEMENT

Amit Thackeray
Amit Thackeray
social share
google news

बातम्या हायलाइट

point

"लोकांच्या समस्या सोडवण्यास जायला हवं होतं, पण नगरसेवक फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ‘आनंदाने’ कैद"

point

अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

Amit Thackeray Facebook Post : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने काठावरचं बहुमत मिळवल्यानंतर महापौरपद मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने यासाठी हॉटेल पॉलिटिक्स सुरु केलंय. शिंदेंच्या नगरसेवकांना वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये ठेवण्यात आलंय. मात्र, शिदेंनी मार्गदर्शनासाठी सर्वांना एकत्र ठेवण्यात आल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. दरम्यान, याबाबत आता मनसे नेते अमित ठाकरेंनी फेसबुक पोस्ट केलीये. अमित ठाकरे नेमंक काय म्हणाले? जाणून घेऊयात.. 

हेही वाचा : प्रेम विवाह केला पण पत्नीचे इंजिनिअरिंगच्या 2 विद्यार्थ्यांसोबत अनैतिक संबंध, लग्नाच्या 4 महिन्यांनंतर गळा दाबून संपवलं

अमित ठाकरे म्हणाले, नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत. याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण?

या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा, असंही अमित ठाकरे यावेळी म्हणाले.

हे वाचलं का?

    follow whatsapp