काळीज पिळवटणारा व्हिडीओ, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचा मृत्यू, आईसह 8 तासांच्या लेकीने घेतले अंत्यदर्शन; महाराष्ट्र हळहळला

Jawan pramod jadhav death wife and baby antya darshan : सातारा तालुक्यातील दरे येथील अपघातात भारतीय सैन्य दलाचे जवान प्रमोद जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रमोद हे आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी काही दिवसांची रजा घेऊन गावी आले होते. कुटुंबात आनंदाचे दिवस येणार, लेकराचा जन्म होणार या अपेक्षेत असतानाच काळाने घाला घातला. अपघातात प्रमोद यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Jawan pramod jadhav death wife and baby antya darshan

Jawan pramod jadhav death wife and baby antya darshan

इम्तियाज मुजावर

11 Jan 2026 (अपडेटेड: 11 Jan 2026, 08:42 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

काळीज पिळवटणारा व्हिडीओ, पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचा मृत्यू,

point

आईसह 8 तासांच्या लेकीने घेतले अंत्यदर्शन; महाराष्ट्र हळहळला

Jawan pramod jadhav death wife and baby antya darshan : संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाला अक्षरशः चटका टाकणारी घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. पत्नीच्या डिलीव्हरीसाठी सुट्टीवर घरी आलेल्या भारतीय सैन्य दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला आणि काही तासांतच त्यांच्या पत्नीने कन्यारत्नाला जन्म दिला. पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या आठ तासांत जन्मलेल्या चिमुकल्या लेकीने आणि गर्भवती अवस्थेतून बाहेर आलेल्या पत्नीने स्ट्रेचरवरून पती-पित्याचे अंतिम दर्शन घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून कोणाच्याही डोळ्यांत पाणी येईल.

हे वाचलं का?

प्रमोद जाधव यांच्या जाण्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ 

भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद जाधव यांचा सातारा जिल्ह्यातील दरे येथे झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. प्रमोद हे आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी काही दिवसांची रजा घेऊन गावी आले होते. कुटुंबात आनंदाचे दिवस येणार, लेकराचा जन्म होणार या अपेक्षेत असतानाच काळाने घाला घातला. अपघातात प्रमोद यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

हेही वाचा : मुंबईची खबर: 3 महिन्यांनंतर सुद्धा अंडरग्राउंड मेट्रोमध्ये नेटवर्क नाही... खरं कारण आलं समोर! 'या' कंपनीमुळे...

अधिकची माहिती अशी की, वीर जवानाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर काही तासांतच प्रमोद यांच्या पत्नीने मुलीला जन्म दिला. एकीकडे बाळाच्या आगमनाचा आनंद, तर दुसरीकडे पतीच्या मृत्यूचे दुःख या दोन टोकाच्या भावना एकाच वेळी सहन करणे कुणालाही अशक्य वाटावे असे होते. मात्र नियतीचा खेळ इथेच थांबला नाही. प्रमोद जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी दरे तर्फ परळी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यदर्शनासाठी रुग्णालयातून थेट स्ट्रेचरवरून गर्भवती पत्नी आणि अवघ्या आठ तासांची चिमुकली लेक आणण्यात आली. पित्याच्या पार्थिवावर फुलं अर्पण करताना आईच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि त्या निरागस बाळाची शांत झोप हा प्रसंग अंगावर काटा आणणारा होता. “आईसह 8 तासांच्या लेकीने स्ट्रेचरवरून घेतले अंत्यदर्शन घेतानाचं दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकाचं काळीज पिळवटून गेलं.

या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. “देशासाठी सेवा करणाऱ्या जवानाच्या कुटुंबावर अशी वेळ येऊ नये,” अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. गावकऱ्यांनी, स्थानिक प्रशासनाने आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत त्यांना धीर दिला. वीर जवान प्रमोद जाधव यांनी देशसेवेसाठी आयुष्य वेचले. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असला, तरी त्यांच्या कन्येच्या रूपाने त्यांची आठवण कायम जिवंत राहणार आहे. हा प्रसंग केवळ एक बातमी नसून, देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या कुटुंबांच्या वेदनांची जिवंत साक्ष आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई विमानतळावर येताच लंडनच्या डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं, FIR मध्ये नेमकं काय?

 

    follow whatsapp