मुंबई विमानतळावर येताच लंडनच्या डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं, FIR मध्ये नेमकं काय?

मुंबई तक

Dr. Sangram Patil News : मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर संग्राम पाटील मुंबई विमानतळावर उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी LOC नुसार तात्काळ मुंबई गुन्हे शाखेला माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई अटकेसाठी नसून केवळ चौकशीपुरती आहे.

ADVERTISEMENT

Dr. Sangram Patil News
Dr. Sangram Patil News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई विमानतळावर येताच लंडनच्या डॉ. संग्राम पाटलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं

point

FIR मध्ये नेमकं काय?

Dr. Sangram Patil News ,मुंबई : परदेशातून मुंबईत आगमन करताच लंडनमधील डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई विमानतळावर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. संग्राम पाटील सोशल मीडियावर भाजप विरोधात आक्रमक भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. मात्र, त्यांना अटक करण्यात आलेली नसून केवळ चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचे मुंबई गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे. डॉक्टर संग्राम पाटील यांच्या नावावर सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान (Information Technology Act) अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्याच अनुषंगाने त्यांच्या विरोधात ‘लूक आऊट सर्क्युलर’ (LOC) जारी करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर संग्राम पाटील मुंबई विमानतळावर उतरताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी LOC नुसार तात्काळ मुंबई गुन्हे शाखेला माहिती दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही कारवाई अटकेसाठी नसून केवळ चौकशीपुरती आहे. आवश्यक चौकशी केल्यानंतर डॉक्टर संग्राम पाटील यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 35(3) अंतर्गत नोटीस देण्यात आली असून, त्यानंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली.

हेही वाचा : कुर्ला: ऑनलाइन गेमसाठी मित्राच्या खात्यातून 30,000 रुपये घेतले अन् हारल्यानंतर पैशांची मागणी केली असता निर्घृण हत्या...

दरम्यान, डॉक्टर संग्राम पाटील यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये नेमके काय नमूद आहे, याबाबत सविस्तर माहिती समोर आली आहे. ठाणे पश्चिम येथे राहणारे निखिल शामराव भामरे (वय 25) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार निखिल भामरे हे भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे सोशल मीडिया सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 14 डिसेंबर 2025 रोजी ‘शहर विकास आघाडी’ नावाच्या फेसबुक अकाउंटवरून तसेच ‘Dr. Sangram Patil’ या फेसबुक अकाउंटवरून काही आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करण्यात आला.

हे वाचलं का?

    follow whatsapp