Kalyan Crime News : वहिनी ही आईसमान असते असं म्हटलं जातं. मात्र, कल्याणमध्ये नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधातून एका महिलेची तिच्याच दिराने डोके भिंतीवर आपटून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपासून बोलणं बंद केल्याच्या रागातून आरोपीने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला थेट झारखंडमधून अटक केली असून, अवघ्या 20 मिनिटांचा उशीर झाला असता तर आरोपी नेपाळमध्ये फरार झाला असता.
ADVERTISEMENT
हेही वाचा : पुणे : रिक्षाचालकावर कोयत्याने वार, कात्रज-नवले पुलावरुन फेकलं, वादाचं कारण समोर!
वहिनीने बोलणं बंद केल्याने दीराकडून वहिनीची हत्या
कल्याण पश्चिम परिसरात राहणाऱ्या गुड्डू देवी या महिलेला 27 एप्रिल रोजी गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असताना 11 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, खडकपाडा पोलिसांच्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. मृत महिला आणि तिचा दीर बम बम कुमार यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं तपासात उघड झालं. काही दिवसांपासून महिलेने आरोपीशी बोलणं बंद केलं होतं. याच कारणावरून आरोपी तिच्या घरी पोहोचला आणि दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात आरोपीने महिलेचे डोके भिंतीवर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली.
हेही वाचा : कामावरुन घरी पोहोचला, बायको घरात यूट्यूबरसोबत दिसली अन् भयंकर कांड!
आरोपी नेपाळला पळाण्याच्या तयारीत असताना अटक
घटनेनंतर आरोपीचा मोबाईल बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान उभं राहिलं होतं. अखेर नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या झारखंडमधील मूळ गावाचा शोध घेतला. डीसीपी अतुल झेंडे, एसीपी अशोक होनमाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक झारखंडमध्ये रवाना करण्यात आलं.
दरम्यान, आरोपीला पोलीस मागावर असल्याची माहिती मिळाल्याने तो नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, स्थानिक पोलिसांच्या मदतीने कल्याण पोलिसांनी त्याला नाट्यमयरीत्या ताब्यात घेतलं. आरोपीला कल्याणमध्ये आणून न्यायालयात हजर करण्यात आलं असून न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी भूषण देवरे करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
10000 अश्लील व्हिडीओ, 40000 फोटो.., टेलीग्रामवरुन विक्री, बँक खात्यात डोळे विस्फारणारी रक्कम!
ADVERTISEMENT











