पालघर: वऱ्हाडाच्या ट्रकवर कंटेनर आदळला, भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू

Mumbai - Palghar Highway Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 11 जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हा भीषण अपघात पालघर जिल्ह्यात घडल्याची माहिती समोर आली.

Mumbai - Palghar Highway Accident

Mumbai - Palghar Highway Accident

मुंबई तक

18 May 2026 (अपडेटेड: 18 May 2026, 06:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात

point

अपघातात तब्बल 12 जणांचा दुर्दैवी अंत

Mumbai - Palghar Highway Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तब्बल 12 जणांचा दुर्दैवी अंत झाल्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भीषण अपघाताची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. या भीषण अपघातात 20 ते 25 जण गंभीरपणे जखमी झालेत. जखमींना तातडीने नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची अधिकची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुलीला विहिरीत फेकलं, दगडानं ठेचून मातीत पुरलं.. बापाचं हैवानी कृत्य

वऱ्हाडाच्या ट्रकवर कंटेनर आदळून भीषण अपघात

घडलेल्या घटनेनुसार, पालघरच्या धानीवरी येथून वऱ्हाडाचा ट्रक येत होता, तसेच त्याच्याच विरुद्ध दिशेने येणारा कंटेनर ट्राकवर आदळला आणि भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेनं परिसर हादरून गेल्याचे वृत्त आहे. बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाचा साखरपुडा होता, याच साखरपुड्यासाठी वऱ्हाडी मंडळी ट्रकमधून जात होते. 

धानीवरी येथील मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहोचताच एका भरधाव वेगाने येणारा कंटेनरने ट्रकला जोराची ठोकर दिली. कंटेनरचा मागील डब्बा निसटला, नंतर ट्रकवर आदळला. कंटेनर धडकल्याने होत्याचं नव्हतं होऊन बसलं. वऱ्हाड वाहून नेणारा ट्रक आणि कंटेनरच्या या धडकेत लांब फेकला गेला.  

हे ही वाचा : चॅट पाहताच पारा चढला, बॉयफ्रेंडनं बीएच्या तरूणीला उसाच्या शेतात नेत..

मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता

वऱ्हाडाच्या ट्रकमध्ये 100 हून अधिक वऱ्हाडी असल्याची माहिती समोर आली. या भीषण अपघातामुळे मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. जखमी वऱ्हाडी मंडळींवर उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत.