Govt Jobs : रेल्वेत लवकरच मेगाभरती, BSc, ITI उत्तीर्णांना मोठी संधी; कधी सुरु होणार अर्जप्रक्रिया?

रेल्वे भर्ती बोर्डाद्वारे (RRB) देशभरात तंत्रज्ञ (Technician) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 2026-27 या वर्षाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 6565 रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Government Jobs

Government Jobs

मुंबई तक

• 03:21 PM • 18 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : रेल्वेत लवकरच मेगाभरती

point

BSc, ITI उत्तीर्णांना मोठी संधी

point

कधी सुरु होणार अर्जप्रक्रिया?

Government Jobs : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या रेल्वे भर्ती बोर्डाद्वारे (RRB) देशभरात तंत्रज्ञ (Technician) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या संदर्भात बोर्डाने केंद्रीय रोजगार अधिसूचना जारी केली असून, 2026-27 या वर्षाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 6565 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील. इच्छुक उमेदवारांना 30 जून 2026 पासून रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल, तर अर्ज करण्याची अंतिम मुदत 29 जुलै 2026 असणार आहे.

हे वाचलं का?

वेतन किती मिळणार?

या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या श्रेणींमधील पदे भरली जातील. यामध्ये 'तंत्रज्ञ ग्रेड-1 सिग्नल' (Technician Grade I Signal) च्या 323 जागा आणि 'तंत्रज्ञ ग्रेड-3' (Technician Grade III) च्या 6242 जागांचा समावेश आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 7 व्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार आहे. 'ग्रेड-1 सिग्नल' पदासाठी सुरुवातीचे मूळ वेतन 29,200 रुपये (लेव्हल 5) असेल, तर 'ग्रेड-3' पदासाठी सुरुवातीचे मूळ वेतन 19,900 रुपये (लेव्हल 2) इतके निश्चित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकर अटकेत, CBI ने ठोकल्या बेड्या; पुण्यात काय घडलं?

शैक्षणिक पात्रता काय?

दोन्ही पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली आहे. 'तंत्रज्ञ ग्रेड-1 सिग्नल' पदासाठी उमेदवाराकडे भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, आयटी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या विषयातील बीएससी (B.Sc.) पदवी, किंवा संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा असणे आवश्यक आहे; तसेच या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्षे आहे. तर 'तंत्रज्ञ ग्रेड-३' पदासाठी उमेदवार 10 वी (मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण असण्यासोबतच संबंधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT कडून मान्यताप्राप्त ITI प्रमाणपत्र किंवा शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) पूर्ण केलेला असावा; या पदासाठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे ठेवण्यात आली आहे.

हे ही वाचा : CA सोबत आंतरजातीय विवाह, छळ आणि ज्योतिषी.. 24 वर्षीय जागृतीचं आयुष्य कसं संपलं?

कुठे करावा अर्ज?

या मेगा भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी अधिसूचनेत दिलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणे बंधनकारक आहे. यामध्ये वयोमर्यादेची गणना अधिसूचनेत नमूद केलेल्या विशिष्ट तारखेनुसार केली जाईल, तसेच उमेदवारांना रेल्वे बोर्डाने ठरवून दिलेले वैद्यकीय निकष (B-1 आणि इतर लागू निकष) आणि नागरिकत्वाचे नियम पूर्ण करावे लागतील. या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती, अधिकृत अधिसूचना आणि ऑनलाईन अर्जाची लिंक रेल्वे भर्ती बोर्डाच्या मुख्य संकेतस्थळावर (www.rrbcdg.gov.in) तसेच सर्व प्रादेशिक RRB च्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून दिली जाईल.