Govt Jobs : कोकण रेल्वेत भरती, फक्त एक मुलाखत अन् थेट नोकरी; काय आहेत निकष?

कोकण रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी फक्त मुलाखतच होणार आहे. याची मुलाखत कुठे होणार आहे, जाणून घ्या.

Government Jobs

Government Jobs

मुंबई तक

• 03:26 PM • 03 Jun 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

Govt Jobs : कोकण रेल्वेत भरती

point

फक्त एक मुलाखत अन् थेट नोकरी

point

काय आहेत निकष?

Government Jobs : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) प्रोजेक्ट इंजिनिअर, टेक्निशियन, यार्ड ऑपरेशन्स सुपरवायझर आणि शंटिंग ऑपरेटर या पदांच्या एकूण 36 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पूर्णपणे कंत्राटी तत्त्वावर म्हणजेच फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर केली जाणार असून, सुरुवातीला हा कार्यकाळ 1 वर्षाचा असेल आणि कामगिरीनुसार तो 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. रेल्वे क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना विशाखापट्टणम येथील वॅगन रिपेअर वर्कशॉपच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित 'थेट मुलाखतीसाठी' (Walk-In Interview) उपस्थित राहावे लागणार आहे.

हे वाचलं का?

'असा' करा अर्ज

या भरती प्रक्रियेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोंकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला www.konkanrailway.com भेट देऊन अर्ज प्रक्रियेची माहिती मिळवता येईल. निवड प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना थेट मुलाखतीला सामोरे जावे लागेल, तसेच आवश्यकतेनुसार गटचर्चा (GD) किंवा लेखी परीक्षा घेतली जाऊ शकते. यानंतर वैयक्तिक मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. या सर्व पदांसाठीच्या मुलाखती 22 जून 2026 आणि 23 जून 2026 रोजी आयोजित करण्यात आल्या असून, निवड झालेल्या उमेदवारांचे नियुक्तीचे ठिकाण व्हीडीपीडी (VDPD) वर्कशॉप, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे असेल.

हे ही वाचा : Pune Metro : टिंडरवर भेटली, व्हाट्सअ‍ॅपवर चॅटिंग अन् तब्बल 7 कोटींचा चुना!

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेचा विचार केला तर, प्रोजेक्ट इंजिनिअर (M&P) पदासाठी उमेदवाराकडे मेकॅनिकल, प्रोडक्शन, ऑटोमोबाईल किंवा संबंधित शाखेतील पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे, तसेच यंत्रसामग्रीच्या दुरुस्तीचा किमान 1 वर्षाचा अनुभव असावा. प्रोजेक्ट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल मेंटेनन्स) पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील पदवी किंवा डिप्लोमा आणि पॉवर डिस्ट्रिब्युशन किंवा इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन दुरुस्तीचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. दोन्ही पदांसाठी एआयसीटीई (AICTE) मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले शिक्षण अनिवार्य आहे.

हे ही वाचा : मित्रासोबत मिळून आधी प्रेयसीवर बलात्कार, नंतर पेट्रोल टाकून जाळलं; कारण काय?

अनुभवाची आवश्यकता

दुसरीकडे, टेक्निशियन (मेकॅनिकल) आणि टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. टेक्निशियन (मेकॅनिकल) उमेदवाराला मेकॅनिकल क्षेत्रात काम करण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव असावा, तर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) उमेदवाराला कोणत्याही इलेक्ट्रिकल प्रणालीच्या दुरुस्ती किंवा देखभालीचा किमान 1 वर्षाचा अनुभव असणे बंधनकारक आहे. पात्रता धारक उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह नियोजित तारखेला मुलाखतीला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.