बीड : महादेव मुंडे यांच्या मुलाला कराडच्या समर्थकाकडून मारहाण, कुटुंबियांचा आरोप; मुंडेंच्या पत्नीचे पोलिस अधीक्षकांना पत्र

मुंबई तक

• 09:20 AM • 22 Feb 2026

Beed Crime : परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला वाल्मिक कराडच्या समर्थकाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. 19 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मात्र त्यांचे आरोपी अद्याप  सापडले नाहीत. त्यामुळे महादेव मुंडे यांचे कुटुंबिय अद्याप दहशतीत वावरत आहेत. दरम्यान, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियास वाल्मिक कराडच्या मुलांकडून धोका असल्याचे पत्र बीडच्या पोलिस अधीक्षकांना लिहिले आहे.

Beed Crime

Beed Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बीड : महादेव मुंडे यांच्या मुलाला कराडच्या समर्थकाकडून मारहाण, कुटुंबियांचा आरोप

point

मुंडेंच्या पत्नीचे पोलिस अधीक्षकांना पत्र

Beed Crime, योगेश काशीद : परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला वाल्मिक कराडच्या समर्थकाने मारहाण केल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे. 19 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला आता दोन वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. मात्र त्यांचे आरोपी अद्याप  सापडले नाहीत. त्यामुळे महादेव मुंडे यांचे कुटुंबिय अद्याप दहशतीत वावरत आहेत. दरम्यान, महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियास वाल्मिक कराडच्या मुलांकडून धोका असल्याचे पत्र बीडच्या पोलिस अधीक्षकांना लिहिले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'कृष्णा आंधळे 3 ते 4 वेळा गावात येऊन गेला...' संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा खुलासा

ट्युशनवरुन येत असताना मारहाण

दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांचा मुलगा ट्युशन वरून घराकडे येत असताना सोमेश्वर नगर भागामध्ये एका व्यक्तीने त्याला अडवून तू कोणाचा आहे? असे विचारले. त्या मुलाने मी महादेव मुंडे यांचा मुलगा आहे असे सांगितल्यानंतर दोन कानाखाली हाणून मारहाण केली आहे.

मारहाण करणारा कराडचा समर्थक

मारहाण करणारा बालाजी आघाव असून तो वाल्मीक कराडचा समर्थक असल्याचं साम टीव्हीशी बोलताना नातेवाईकांनी सांगितले आहे. मारहाण का झाली, कशामुळे झाली याची चौकशी आता परळी पोलीस करत असून अज्ञात विरुद्ध परळी पोलिसांमध्ये गुन्हा करण्यात आला आहे.

हे ही वाचा : बीड : माजलगावच्या लॉजमधील 'त्या' खोलीत दुर्गंधी पसरली होती, दरवाजा उघडताच नको तेच... पुढे काय घडलं?

पत्रात काय म्हटले आहे?

दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडच्या पोलिस अधीक्षकांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, 'वाल्मिक कराडच्या दोन्ही मुलांकडून आमच्या कुटुंबियांच्या जीवितास धोका आहे. काही अनपेक्षित किंवा अनैसर्गिक घटना घडल्यास कराडची दोन्ही मुले व त्याची टोळी जबाबदार राहतील. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी.'