बीड : सुट्टीला मामाकडे आली अन् सगळं आयुष्य उद्ध्वस्त, 13 वर्षीय मुलीसोबत घडलं नको तेच

बीडच्या केज तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर मामेभावाकडून लैगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

Beed Crime

Beed Crime

मुंबई तक

28 May 2026 (अपडेटेड: 28 May 2026, 12:50 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

बीड : सुट्टीला मामाकडे आली अन् सगळं आयुष्य उद्ध्वस्त

point

13 वर्षीय मुलीसोबत घडलं नको तेच

Beed Crime, रोहिदास हातागळे : बीडच्या केज तालुक्यातून नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. तालुक्यातील एका गावात उन्हाळी सुट्टीत आजोळी आलेल्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच 25 वर्षीय चुलत मामेभावाने तोंड आणि हात बांधून बलात्कार केल्याची धक्कादायक व संतापजनक घटना घडली आहे. ही घटना 25 मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत नराधम आरोपीला अटक केली आहे.

हे वाचलं का?

घरात एकटीच झोपलेली असताना..

माजलगाव तालुक्यातील रहिवासी असलेली आणि आठवीच्या वर्गात शिकणारी ही पीडित मुलगी 22 मे रोजी तिच्या आत्यासोबत केज तालुक्यातील मामाच्या गावी आली होती. 25 मे रोजी दुपारी मुलगी घरात एकटीच झोपलेली असताना तिचा चुलत मामेभाऊ तिथे आला. त्याने आजीबद्दल विचारणा केली असता, ती सरपण आणण्यासाठी शेतात गेल्याचे मुलीने सांगितले. घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपीने आतून दरवाजा बंद केला. मुलीने विरोध करण्याचा आणि ओरडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने रुमालाने तिचे तोंड आणि दोरीने हात बांधून तिच्यावर बळजबरीने पाशवी अत्याचार केला.

हे ही वाचा : बीड : 15 वर्षीय मुलगी घरात एकटीच, आजोबा अन् चुलत भाऊ राक्षस बनले, भयंकर कांड

गोधडीत लपून बसला

त्यानंतर काही वेळाने पीडितेची आजी शेतातून परत आल्याची चाहूल लागताच, आरोपीने कुणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली आणि घरातच गोधडी ओढून लपून बसला. पीडित मुलीने कशीबशी तोंडाची गाठ सोडून दरवाजा उघडला आणि आजीला हाक मारली. आजी घरात येताच आरोपी आजीला जोराचा धक्का देऊन तिथून पळून गेला. घाबरलेल्या पीडितेने घडलेला प्रकार आजीला सांगितला. आजीने तत्काळ मुलीचे आई-वडील आणि मामाला याची माहिती दिली. 26 मे रोजी सर्व नातेवाईक केज पोलीस ठाण्यात पोहोचले आणि 27 मे रोजी रात्री उशिरा पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा : बीड : सावत्र आई आणि मुलाच्या प्रेमसंबंधांचा थरारक शेवट, नेमकं काय घडलं?

आरोपी अटकेत

याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात कलम 65(1), 333, 115(2), 351(2) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी रात्रीच आरोपीच्या गावात जाऊन त्याला ताब्यात घेतले. या संपूर्ण गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर करत आहेत.