BSNL Recruitment : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने कनिष्ठ दूरसंचार अधिकारी (JTO-Telecom) या पदासाठी थेट भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 26 मे रोजी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून, पात्र उमेदवारांना 4 जून पासून ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. 3 जुलै ही अर्ज करण्याची शेवटचा तारीख आहे. अर्ज भरताना काही चूक झाल्यास, त्यात दुरुस्ती करण्यासाठी 4 जुलै ते 11 जुलैपर्यंत वेळ दिला जाईल. तसेच, या पदासाठीची संगणक आधारित परीक्षा (CBT) ऑगस्ट 2026 मध्ये तात्पुरती नियोजित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून दूरसंचार (Telecommunications), इलेक्ट्रॉनिक्स (Electronics), रेडिओ (Radio), कॉम्प्युटर (Computer), इलेक्ट्रिकल (Electrical), माहिती तंत्रज्ञान (IT), किंवा इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) यांपैकी कोणत्याही एका शाखेतील अभियांत्रिकीची (B.E./B.Tech) पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय, ज्या उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स या विषयांत एम.एस्सी. (M.Sc.) पूर्ण केले आहे, ते देखील या भरतीसाठी पात्र मानले जातील.
हे ही वाचा : मोठी बातमी... आदित्य ठाकरेंनी CM फडणवीसांना मध्यरात्री केला फोन, कोणाची काढली विकेट?
'इतका' पगार मिळणार
निवड झालेल्या उमेदवारांना 'IDA' वेतनश्रेणीनुसार [E-1] 16,400 ते 40,500 रुपये वेतन दिले जाईल. उमेदवारांना नियुक्तीनंतर दोन वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल. यासोबतच, नियुक्तीच्या तारखेपासून किमान 5 वर्षे बीएसएनएल (BSNL) मध्ये सेवा देण्यासाठी उमेदवारांना 6 लाख रुपयांचा सेवा बंधपत्र (Bond) लिहून देणे बंधनकारक असणार आहे.
हे ही वाचा : सोलापूर : रीलस्टार विवाहिता स्वत:च्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात गेली, अन् सर्वांची झोप उडाली
'असा' करा अर्ज
या भरती प्रक्रियेसाठी खुला प्रवर्ग (UR), इतर मागासवर्गीय (OBC) आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल (EWS) घटकातील उमेदवारांना 2000 रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी हे परीक्षा शुल्क 1000 रु. निश्चित करण्यात आले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत वेळेत आपले अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी bsnl.co.in या वेबसाइटला भेट द्यावी.
ADVERTISEMENT











