Maharashtra weather : वादळं वारं सुटलं रं.. विजांच्या कडकडाटासह पावसाचं थैमान, 13 जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून काही भागांत मान्सून पूर्व पावसाला पोषक अशी स्थिती निर्माण होताना जाणवत आहे. अशातच 27 मे 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज घ्या जाणून.

Maharashtra weather

Maharashtra weather

मुंबई तक

• 05:00 AM • 27 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात हवामानात सातत्याने बदल

point

जाणून घेऊयात एकूण हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात हवामानात सातत्याने बदल होताना दिसत असून काही भागांत मान्सून पूर्व पावसाला पोषक अशी स्थिती निर्माण होताना जाणवत आहे. 27 मे 2026 रोजी कोकण 4 आणि विदर्भ 3 जिल्ह्यांसाठी उष्णतेचा यलो अलर्ट, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मिळून 13 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला, जाणून घेऊयात एकूण हवामानाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : नात्याला काळिमा! कल्याणमध्ये बापाने लेकीला देखील सोडलं नाही, तिच्यावर...

कोकण 

कोकण विभागातील पालघर जिल्ह्यात हवामान उष्ण-दमट राहण्याची अधिक शक्यता आहे. ठाणे, मुंबई, रायगड या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट वातावरणार राहणार असून दुपारी पावसाची शक्यता जाणवेल. रत्नागिरी जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 

उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रात धुळे, नंदूरबार, जळगाव या तीन जिल्ह्यांत हवामान कोरडं राहणार असल्याची शक्यता आहे. नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशातच काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार होण्याची अधिक शक्यता आहे. काही भागांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हे ही वाचा : समजून घ्या: युतीचा इतिहास आणि 'ती' भळभळीत जखम, शिंदेंना का करावी लागते दिल्लीवारी?

विदर्भ 

विदर्भातील भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला. या भागांत तापमान हे सरासरीहून अधिक जाणवणार आहे. या विभागाला उष्माघाताचा धोका अधिक जाणवेल.