Maharashtra Weather : राज्यातील हवामानात काही प्रमाणात बदल जाणवेल अशी शक्यता अधिक आहे. तसेच काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहिल्यास सकाळी धुके तर दुपारनंतर उन्हाचे चटके अधिक सहन करावे लागतील. दरम्यान 26 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज असेल अशी शक्यता आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : नालासोपाऱ्यात आईने 15 वर्षाच्या मुलीची दगडी जात्याने डोकं ठेचून केली हत्या, खूनाचं कारण आलं समोर
कोकण :
कोकणात अंशत: ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. मुंबईमध्ये सकाळी धुक्याचं प्रमाण जाणवू शकते. उष्णता देखील जाणवणार आहे. यामुळे काही प्रमाणात थंडावा कमी असेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात हवामान संमिश्र स्वरुपाचे असणार आहे. तसेच परिसरात धुक्याची चादर पसरेल. दिवसभर कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सकाळी काही प्रमाणात गारठा तर दुपारी उष्णता जाणवेल.
मराठवाडा :
मराठवाडा विभागात सकाळी धुक्यांसह काही प्रमाणात ढगाळ वातावरण जाणवेल. छत्रपती संभाजीनगरात सकाळी धुक्यांसह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. हवामानात काही प्रमाणात चढ उतार जाणवण्याची शक्यता अधिक आहे.
हे ही वाचा : जालना : 18 वर्षीय पवनने मुलीला चिठ्ठी दिली, पण जीवानीशी गेला; अंबड तालुक्यात काय घडलं?
विदर्भ :
विदर्भात सकाळच्या वेळेत हवामान हे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर वातावरण ढगाळ राहील. नागपुरासह काही ठिकाणी सकाळी गारवा आणि दुपारी उष्णता राहण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











