साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या शाळेची भिंत गोठ्यावर कोसळली, जनावरांचा मृत्यू

इम्तियाज मुजावर

06 Jul 2026 (अपडेटेड: 06 Jul 2026, 03:38 PM)

Maharashtra Monsoon : सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने आता जीवित आणि वित्तहानी होऊ लागली आहे. पहाटे 4 वाजताच्या सुमारास खंडाळा तालुक्यातील मिरजे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत एका गोठ्यावर कोसळली. या दुर्घटनेत एका बकरीचा आणि कोकराचा मृत्यू झाला आहे.

Maharashtra Monsoon

Maharashtra Monsoon

Google CTA

बातम्या हायलाइट

point

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत कोसळून जनावरांचा मृत्यू

point

पशुपालकाचं मोठं आर्थिक नुकसान

Maharashtra Monsoon : सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने आता जीवित आणि वित्तहानी होऊ लागली आहे. पहाटे 4 वाजताच्या सुमारास खंडाळा तालुक्यातील मिरजे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत एका गोठ्यावर कोसळली. या दुर्घटनेत एका बकरीचा आणि कोकराचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं गाव हादरून गेलं आहे, सध्या राज्यभरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच अशा गंभीर घटना घडू लागलेल्या आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईच्या मानखुर्दमध्ये भीषण दुर्घटना, घर कोसळून 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू

पशुपालकाचं मोठं आर्थिक नुकसान

या घटनेनं पशुपालक महादेव रामचंद्र सोनवणे यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेळीच्या जीवावर दुधाचे काही प्रमाणात उत्पन्न मिळायचे, मात्र शेळीचा मृत्यू झाल्याने महादेव यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. या घटनेनं गावात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी प्रशासनाला आर्थिक मदत करावी, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.  

सततच्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाने अशा गंभीर दुर्घटना घडू लागलेल्या आहेत. या घटनेनं सुरक्षेबाबतचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. जीर्ण झालेल्या सरकारी इमारतींची वेळेवर दुरुस्ती का करण्यात आली नाही? असा प्रश्न केला जात आहे. 

हे ही वाचा : टिटवाळ्यात घरात शिरलं पाणी, वृद्ध महिलेचा पाणी काढण्यासाठी संघर्ष, Video व्हायरल

अशातच स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली आहे.  तर दुसरीकडे पाऊस सुरूच असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.