SSC 10th Result 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. मंडळाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, परीक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी 92.02 टक्के इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोकण विभाग हा निकालात अव्वल ठरला आहे. 97.62 टक्के इतके विद्यार्थी कोकण विभागातून उत्तीर्ण झाले आहेत. सर्वात कमी निकाल हा छत्रपती संभाजीनगर विभागाचा लागला आहे. 88.41 टक्के इतका तो निकाल आहे. यावेळी मुलींनी बाजी मारली आहे. एकूण परीक्षा दिलेल्या मुलींपैकी 94.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 89.56 टक्के मुलं उत्तीर्ण झाली आहेत.
ADVERTISEMENT
अनुत्तीर्णांसाठी पुरवणी परीक्षा
मंडळाने सांगितले की, 'अकरावीचे वर्ग लवकर सुरु व्हावेत यासाठी दहा दिवस अगोदर परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 64 विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा पार पडली होती. एकूण 15,42,472 इतक्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी 14,20,486 इतके विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा 6612 शाळांचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे. बेस्ट ऑफ फाईव्हचा निकष या निकालासाठी वापरण्यात आला.' तसेच जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत त्यांनी पुरवणी परीक्षा द्यावी असे आवाहन मंडळाने केले आहे.
हे ही वाचा : 105 जवान अन् जंगलात 48 तास सर्च ऑपरेशन, अकोला अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक
'असा' आहे विभागनिहाय निकाल
कोकण विभाग : 97.62 टक्के
कोल्हापूर विभाग : 95.47 टक्के
मुंबई विभाग : 94.97 टक्के
पुणे विभाग : 94.24 टक्के
अमरावती विभाग : 90.50 टक्के
नाशिक विभाग : 90.53 टक्के
नागपूर विभाग : 89.07 टक्के
लातूर विभाग : 88.42 टक्के
छत्रपती संभाजीनगर विभाग : 88.41 टक्के
ADVERTISEMENT











