Maharashtra SSC Class 10 result: मोठी बातमी.. दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर, 'ही' आहे लिंक

Maharashtra SSC Result 2026 LIVE, MSBSHSE Class 10 Results Direct Link: महाराष्ट्र बोर्डाचा 10 वीचा निकाल उद्या, 8 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होईल. विद्यार्थी आपला निकाल अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.

maharashtra ssc class 10 result date for class 10 results has finally been announced results will be declared online on may 8th at 1 pm

फाइल फोटो

मुंबई तक

07 May 2026 (अपडेटेड: 07 May 2026, 08:00 PM)

follow google news

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)इयत्ता 10 वी (SSC) परीक्षेचा निकाल उद्या, 8 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता घोषित करणार आहे. लाखो विद्यार्थ्यांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचे गुणपत्रक (Marksheet) अधिकृत वेबसाइट्सवरून डाउनलोड करू शकतील. 

हे वाचलं का?

SSC चा निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट्स

  1. mahresult.nic.in
  2. mahahsscboard.in

हे ही वाचा>> Maharashtra SSC Result 2021: 10वीचा ऑनलाइन निकाल ‘इथे’ पाहता येणार, पाहा निकालाच्या वेबसाइट कोणत्या

SSC चा निकाल कसा पाहता येईल? 

  • अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
  • होमपेजवर उपलब्ध “SSC Result 2026” लिंकवर क्लिक करा.
  • आपला रोल नंबर किंवा सीट नंबर प्रविष्ट करा.
  • आईचे नाव टाका.
  • डिटेल्स सबमिट करा.
  • स्क्रीनवर निकाल दिसेल. तो डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट घ्या.
  • याशिवाय, DigiLocker अॅप किंवा SMS सुविधेद्वारेही डिजिटल मार्कशीट उपलब्ध होईल.

हे ही वाचा>> Maharashtra SSC Result 2024 Online: 10वीचा निकाल मोबाइल आणि वेबसाइटवर कसा पाहायचा?

10 वीच्या निकालाचे मागील काही वर्षांचे आकडे (तुलनात्मक माहिती)

  1. 2025 निकाल (13 मे रोजी जाहीर): 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, 15,98,553 विद्यार्थी परीक्षेला बसले, 14,87,399 उत्तीर्ण. एकूण पास टक्केवारी 93.04%.
  2. 2024 निकाल (27 मे रोजी): पास टक्केवारी 95.81%.
  3. 2023 निकाल (2 जून रोजी): पास टक्केवारी 93.83%.

यावर्षी सुमारे 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असल्याचे अपेक्षित आहे. निकालानंतर गुणपत्रक, पुनर्मूल्यांकन प्रक्रिया, टॉपर्स यादी इत्यादी माहितीही मंडळाकडून उपलब्ध केली जाईल.