105 जवान अन् जंगलात 48 तास सर्च ऑपरेशन, अकोला अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक

मुंबई तक

अकोला जिल्ह्यातील सावरगावमध्ये एका 60 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला होता. या प्रकरणाने सगळेच जण हादरुन गेले होते. अत्याचार करुन आरोपी फरार झाला होता. अखेर 48 तासानंतर आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

ADVERTISEMENT

Akola Crime
Akola Crime
google news

बातम्या हायलाइट

point

105 जवान अन् जंगलात 48 तास सर्च ऑपरेशन

point

सावरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक

Akola Crime, धनंजय साबळे : अकोला जिल्हयातील पातुर तालुक्यातील सावरगाव येथे एका 10 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाने सगळेच जण हादरुन गेले होते. मात्र, अकोला पोलिसांनी 'ऑपरेशन सावरगाव' राबवत अत्यंत दुर्गम जंगल परिसरातून नराधम आरोपीला 48 तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. जगराम गोविंदा आडे (60, रा. सावरगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

5 मे 2026 रोजी सावरगाव येथील पीडित मुलगी घरी एकटी असताना, तिचे आई-वडील मजुरीसाठी बाहेर गेले होते. याचाच फायदा घेऊन आरोपी जगराम आडे याने घरात शिरून तिच्यावर अत्याचार केला आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. घडलेली घटना पीडितेने पालकांना सांगितल्यानंतर 9 मे रोजी चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

हे ही वाचा : 'ती' मुलाला शाळेत सोडवून घरी येत होती, भाजप नेत्याने भर रस्त्यात अडवून केलं नको 'ते'

पोलिसांपुढे होते मोठे आव्हान

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तपासासाठी विशेष टीम तयार करण्याचे निर्देश दिले. मात्र, आरोपीकडे मोबाईल नव्हता, पोलिसांकडे त्याचा कोणताही फोटो उपलब्ध नव्हता आणि सर्वात मोठे आव्हान म्हणजे 20-25 किलोमीटरचा घनदाट जंगल परिसर. आरोपीला या भौगोलिक परिस्थितीची खडान् खडा माहिती असल्याने तो पोलिसांना हुलकावणी देत होता.

हे ही वाचा : Maharashtra SSC Class 10 result: मोठी बातमी.. दहावीच्या निकालाची तारीख अखेर जाहीर, 'ही' आहे लिंक

105 जवान आणि 'ऑपरेशन सावरगाव'

आरोपीला पकडण्यासाठी 105 पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची 3 पथके, चान्नी पोलीस, आरसीपीच्या 2 तुकड्या, 2 श्वान पथकं आणि 4 ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेण्यात आली. 6 आणि 7 मे रोजी भर उन्हात पोलिसांनी वसाली, नवेगाव, पांगरताटी आणि शेकापूरच्या जंगलात पायी सर्च ऑपरेशन राबवले. अखेर 7 मे रोजी वनविभाग आणि गावकऱ्यांच्या मदतीने आरोपीला सावरगावच्या जंगलातून झडप घालून अटक करण्यात आली.

हे वाचलं का?