'ती' मुलाला शाळेत सोडवून घरी येत होती, भाजप नेत्याने भर रस्त्यात अडवून केलं नको 'ते'
UP Crime News : भाजप युवा मोर्चाच्या माजी उपाध्यक्षाने एका महिलेची छेडछाड केल्याप्रकरणी आणि तिला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'ती' मुलाला शाळेत सोडवून घरी येत होती
भाजप नेत्याने भर रस्त्यात अडवून केलं नको 'ते'
UP Crime News : उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. भाजप युवा मोर्चाचा माजी उपाध्यक्ष ईशान सक्सेना याच्यावर एका महिलेने छेडछाड, पाठलाग करणे आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि मोबाईल फोन जप्त केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, पीडित महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार प्रेम नगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दवा पुरवठा करण्याच्या व्यवसायाशी निगडित असलेल्या ईशानने आपल्या पदाचा आणि ओळखीचा गैरफायदा घेऊन महिलेला मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : 219 कॉल्स अन् दगडाने ठेचून हत्या, वहिनीच्या प्रेमात दीर आकंठ बुडाला, कुणाचा झाला शेवट?
औषध पुरवठ्याच्या बहाण्याने जवळीक; पैशांसाठी महिलेकडे सुरू होता तगादा
पोलीस तपासामध्ये या वादाची मूळ कारणे समोर आली असून, आरोपी ईशान सक्सेना औषध पुरवठा करण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पीडित महिलेच्या मुलाला औषधे देण्याच्या निमित्ताने तो महिलेच्या संपर्कात आला होता. या ओळखीचा फायदा घेत त्याने हळूहळू महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्याकडून आधीच हजारो रुपये उकळले होते आणि तरीही त्याची हाव कमी झाली नव्हती. तो आता लाखो रुपयांची मागणी करत होता आणि त्यासाठी महिलेवर सतत दबाव निर्माण करत होता. पैशांच्या हव्यासापोटी त्याने महिलेचे आयुष्य असह्य केले होते, ज्यामुळे संतापलेल्या पीडितेने अखेर पोलिसांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : नागपूर : कॉलेजमधील वासनांध तरुण, सावत्र आईच्या बेडरुममध्ये जायचा; प्रेग्नंट राहिली अन्...
भररस्त्यात अडवून केली छेडछाड; पोलिसांनी रचला अटकेचा सापळा
महिनेभरापासून सुरू असलेल्या या त्रासानंतर आरोपीची हिंमत इतकी वाढली की त्याने सार्वजनिक ठिकाणी पीडितेचा विनयभंग करण्याचे धाडस केले. ही घटना तेव्हा घडली जेव्हा पीडित महिला आपल्या मुलाला शाळेत सोडून घरी परतत होती. भररस्त्यात ईशानने आपली स्कॉर्पिओ गाडी महिलेच्या गाडीसमोर आडवी लावून तिला थांबवले आणि तिथेच तिच्याशी छेडछाड करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याने महिलेला जीवे मारण्याची धमकीही दिली, ज्यामुळे ती प्रचंड दहशतीखाली होती. महिलेने तात्काळ प्रेम नगर पोलीस ठाण्यात आपली आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने दबिश दिली आणि ईशान सक्सेनाला त्याच्या घरातून ताब्यात घेतले, ज्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात अत्यंत कडक पावले उचलली आहेत. अटक केल्यानंतर आरोपीच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून त्यानंतर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईनंतर स्पष्ट केले आहे की, महिलांची सुरक्षा ही प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि यामध्ये सहभागी असलेल्या गुन्हेगाराची राजकीय पार्श्वभूमी विचारात घेतली जाणार नाही.









