Nashik TCS Nida Khan Arrested, प्रवीण ठाकरे : नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अटक करण्यात आली आहे. नाशिक क्राइम ब्रँचने छत्रपती संभाजीनगरच्या नरेगाव परिसरातून तिला अटक केली. छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.
ADVERTISEMENT
छत्रपती संभाजीनगरमधून अटक
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर पोलीस आणि नाशिक क्राइम ब्रँचने तिला पकडण्यासाठी जॉईंट ऑपरेशन केले. रात्री 11.30 वाजता तिची आरोग्य तपासणी झाल्यानंतर तिला ट्रान्सफर वॉरंटसाठी छत्रपती संभाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. निदा खान ही नरेगाव येथील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमध्ये रहात होती. तिच्यासोबत तिचे चार नातेवाईकदेखील त्या फ्लॅटमध्ये रहात होते.
हे ही वाचा : 105 जवान अन् जंगलात 48 तास सर्च ऑपरेशन, अकोला अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक
अटकपूर्व जामीन फेटाळला
निदा खान ही नाशिक टीसीएस प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. 25 मार्चपासून ती फरार होती. तिने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयाने 2 मे रोजी तिचा अर्ज फेटाळला होता.
हे ही वाचा : 'ती' मुलाला शाळेत सोडवून घरी येत होती, भाजप नेत्याने भर रस्त्यात अडवून केलं नको 'ते'
आज काय होणार?
निदा खानला पकडण्यासाठी नाशिक पोलीस बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होते. अखेर तिला पकडण्यात यश आले. आज तिला नाशिक येथील न्यायालयात हजर करण्यात येईल.
ADVERTISEMENT











