Maharashtra Board Class 10th Result 2024 Out: : (ओमकार वाबळे, पुणे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (SSC Exam Results) आज जाहीर करण्यात आला. दहावी परीक्षेत कोकण विभागाचा निकाल राज्यात सर्वाधिक लागला असून, सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने निकालाबद्दल ठळक माहिती जाहीर केली आहे. (Maharashtra SSC exam Result 2024 Latest news)
ADVERTISEMENT
SSC Result Updates : दहावीच्या निकालातील दहा महत्त्वाचे मुद्दे
1) या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,४९,३२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १४,८४,४४१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.८१ आहे.
मुलींचा निकाल किती टक्के? | 97.21% |
मुलांचा निकाल किती टक्के लागला? | 94.56% |
कोणत्या मंडळाचा निकाल सर्वाधिक? | कोकण (99.01%) |
कोणत्या मंडळाचा निकाल सर्वात कमी? | नागपूर (94.73%) |
महाराष्ट्राचा निकाल किती टक्के लागला? | 99.01% |
100 टक्के निकाल लागलेल्या शाळांची संख्या किती? | 9,382 |
2) या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,७७० पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३२७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,९५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ५१.१६ आहे.
हेही वाचा >> 10वीचा निकाल मोबाइल आणि वेबसाइटवर कसा पाहायचा?
3) या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण २५,८९४ खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २५,३६८ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी २०,४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ८०.४२ आहे.
4) या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण ९१४९ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९०७८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी ८४६५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.२५ आहे. ५
5) या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून नियमित, पुनर्परिक्षार्थी व खाजगी मिळून एकूण १६,११,८१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १६,००,०२१ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले असून त्यापैकी १५,१७,८०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.८६ आहे.
हेही वाचा >> दहावीचा निकाल बघताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
6) सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९९.०१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (९४.७३%) आहे.
7) सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.२१ असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५६ आहे. म्हणजेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा २.६५ ने जास्त आहे.
8) एकूण १८ विषयांचा निकाल १००% टक्के लागला आहे.
9) राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ५,५८,०२१ विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, ५,३१,८२२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ३,१४,८६६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत, ७९,७३२ विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
10) राज्यातील २३,२८८ माध्यमिक शाळांतून १५,६०,१५४ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९,३८२ शाळांचा निकाल १०० % लागला आहे.
ADVERTISEMENT
