Maharashtra Weather: कोकणातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, तर काही ठिकाणी येलो अलर्ट जारी

Maharashtra Weather Today: भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) राज्यात  4 ऑक्टोबर रोजी मध्यम ते मुसळधार पाऊस, वि‍जेसह  वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

maharashtra weather

maharashtra weather

मुंबई तक

04 Oct 2025 (अपडेटेड: 04 Oct 2025, 09:28 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार

point

राज्यात 4 ऑक्टोबर रोजी पावसाची परिस्थिती

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD) राज्यात  4 ऑक्टोबर रोजी मध्यम ते मुसळधार पाऊस, वि‍जेसह  वादळी वारे वाहण्याचा अंदाज वर्तवला आहे. हा इशारा 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीत असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामध्ये, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत 'अतिरिक्त' पावसाची शक्यता जारी केली आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'चोली के पीछे क्या है', मुलींना पाहून तरुण म्हणू लागला गाणं, भररस्त्यात नेमकं काय घडलं?

कोकण विभाग :

कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे. या जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यात हवामान विभागाने हलका ते मध्यम पावसाचा अंदाज जारी केला आहे. रायगड, रत्नागिरीत मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद जारी करण्यात आली आहे. 

मध्य महाराष्ट्र विभाग :


मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर, सोलापूरमध्ये हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. 


मराठवाडा विभाग :

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला या जिल्ह्यांचा समावेश आहे. या एकूण जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर,  जालना या दोन जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : विसर्जनावेळी मोठा अनर्थ! ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली अन् थेट तलावात, 13 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये 10 लहान मुलांचा समावेश

विदर्भ विभाग :

अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी अकोला. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर बुलढाणा जिल्ह्यात हवामानाचा अंदाज वर्तवलेला नाही. 

    follow whatsapp