वयाच्या 54 व्या वर्षी महिलेनं 17 व्या बाळाला दिला जन्म, डॉक्टरही चक्रावून गेले, पालनपोषणासाठी 20 टक्के दराने घेतात पैसे

Viral News : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार विविध कार्यक्रम राबवत असताना, एका महिलेनं वयाच्या 54 व्या वर्षी 17 व्या बाळाला जन्म दिला. या घटनेनं सर्वनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

Woman gives birth to 17th child at age 54

Woman gives birth to 17th child at age 54

मुंबई तक

03 Oct 2025 (अपडेटेड: 03 Oct 2025, 01:35 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचा वयाच्या 54 व्या वर्षी 17 व्या बाळाला दिला जन्म

point

डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का

Viral News : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार विविध कार्यक्रम राबवत असताना, एका महिलेनं वयाच्या 54 व्या वर्षी 17 व्या बाळाला जन्म दिला. या घटनेनं सर्वनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना राजस्थान जिल्ह्याच्या उदयपूरमधील आहे. महिलेचं नाव रेखा कालंबेलिया असं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : विसर्जनावेळी मोठा अनर्थ! ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली अन् थेट तलावात, 13 जणांचा बुडून मृत्यू, मृतांमध्ये 10 लहान मुलांचा समावेश

या वयात 17 व्या बाळाला जन्म देणं कदाचित अतिशयोक्ती किंवा चमत्कार वाटेल पण हे खरं आहे. या घटनेनं डॉक्टरही चक्रावून गेलेत. रेखा यांची यापूर्वी चार मुलं आणि एका मुलीचा जन्मानंतर काही तासानंतरच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय. परिस्थिती हलाखीची असूनही रेखा यांनी 17 बाळांना जन्म का दिला असावा असा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय.

20 टक्के व्याजदराने कर्ज घेऊन पालनपोषण

रेखा यांचे पती कवरा कालबेलिया म्हणाले की, त्यांच्याकडे राहण्यासाठी स्वत:चे घर नाही. मोठ्या कष्टाने ते जीवन जगतायत. मुलांच्या पालनपोषणासाठी त्यांना 20 टक्के व्याजदराने कर्ज घेऊन पालनपोषण करावं लागतं. रेखाच्या पाच मुलांचा विवाह झाला आहे.

'हम दो हमारे दो' नाऱ्याला तिलांजलि

'हम दो हमारे दो' या नाऱ्याला रेखा यांनी तिलांजलि दिलीये, असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. आरोग्य विभाग आणि प्रशासन दररोज कोट्यवधि रुपये खर्च करताना दिसते. अशिक्षितपणामुळे अशा घटना घडू लागल्याचं चित्र असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

डॉक्टरंही झाले थक्क

या प्रकरणात, रेखाची प्रसूती करणारे डॉक्टरंही थक्क झाले आहेत. अशी घटना किंवा अशी केस मी याआधी कधीच पाहिली नाही. वयोमानानुसार, या वयात बाळाला जन्म देणं आश्चर्याचीच बाब आहे, मी आश्चर्यचकीत झालो. आतापर्यंत पाच ते सहा बाळांना जन्म दिलेला मी पाहिला होता, असं डॉक्टर म्हणाले होते.

हे ही वाचा : Mumbai Crime : 500 रुपये म्हणत वेश्येनं तरुणाला नेलं लॉजवर, नंतर अश्लील व्हिडिओ बनवत... बाईच्या नादानं सारंच लुबाडलं

दरम्यान, अशाच एक धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील माहीरी गावात घडला होता. एका महिलेनं तब्बल सात बाळांना जन्म दिला होता. आधी चार आणि नंतर तीन बाळांना जन्म दिला होता. या घटनेनंही सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

    follow whatsapp