आमच्या काळजाचा विषय, आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याच्या WhatsApp स्टेटसला वाल्मिक कराडचे फोटो

Beed : जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेला शासकीय कर्मचाऱ्याकडूनच केराची टोपली.

Mumbai Tak

मुंबई तक

03 Oct 2025 (अपडेटेड: 03 Oct 2025, 02:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेला शासकीय कर्मचाऱ्याकडूनच केराची टोपली

point

वाल्मीक कराड हा संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार

Beed : बीड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी कालिदास सानप याने रात्री स्वतःच्या व्हाटस्अप स्टेटसला वाल्मीक कराडचे पोस्टर ठेवले. यावर 'शेवटी विषय आमच्या काळजाचा आहे WE SUPPORT WALMIK ANNA' असा खून प्रकरणातल्या आरोपीचं समर्थन करणारा मजकुर आहे. तर दुसर्‍या पोस्टरवर देखील मुंडे घरण्यातील सर्वांचे फोटो लावण्यात आले असून माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शेजारी आरोपी वाल्मीक कराड याचा फोटो आहे.

हे वाचलं का?

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेला कर्मचाऱ्यांकडूनच केराची टोपली

काही दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी आरोपीचे समर्थन करणारे बॅनर लावू नयेत किंवा त्यांचे समर्थन होईल असे कृत्य करू नये, अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. मात्र या सूचनांचे पालन न करता एका शासकीय कर्मचार्‍यानेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे. शिवाय  खून आणि खंडणीतील आरोपी वाल्मीक कराड याला पाठिंबा दर्शवणारे पोस्टर आपल्या स्टेटसला लावले आहेत. विशेष म्हणजे हा शासकीय कर्मचारी आहे आणि त्याने आरोपीच्या केलेल्या समर्थनामुळे चर्चा होत आहे.

हेही वाचा : दारु पिऊन एसटी चालवली म्हणून गुन्हा दाखल झाला, अन् चालकाने बसमध्येच गळफास घेतला; आहिल्यानगरमधील घटना

संतोष देशमुख्य हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या वादातून अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे. सध्या तो बीडच्या तुरुंगात असून जामीनासाठी वारंवार न्यायालयात अर्ज करत आहे. मात्र, न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय. मोक्कामधून नाव वगळण्यात यावं, यासाठी वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयात सातत्याने अर्ज केला आहे. सध्या त्याच्या वकिलांच्या टीमने मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.

दरम्यान, वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनाही मंत्रिपद गमवावं लागलंय. मात्र, त्यांचे समर्थक सातत्याने वाल्मिक कराडचे पोस्टर झळकवताना पाहायला मिळतात. पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यात देखील वाल्मिक कराडचे पोस्टर पाहायला मिळाले होते. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीका केली होती. 

दसरा मेळाव्यात वाल्मिक कराडचे पोस्टर झळकल्यानंतर दमानिया म्हणाल्या, हे सगळं ऐकून मला धक्का बसला. वाल्मिक कराडचा एकही बॅनर झळकला असेल तर शरमेने मान खाली घालावी लागेल. राजकारणात विकृती आली आहे. राजकारणातील विकृती लोकांच्या मानसिकतेतही पोहोचली आहे. इतक्या खालच्या दर्जाची कृत्य करून सुद्धा या लोकांचे अशा पद्धतीचे बॅनर झळकत असतील तर पंकजा मुंडे यांना घेराव घालून हा याबाबत प्रश्न विचारला पाहिजे. यावर तुमचे म्हणणे काय? 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बळीराजाचा आनंद गगनात मावेना, कोथिंबिरची पेंडी 170 रुपयांना तर मेथीची 70 रुपयांवर; तुमच्या शहरातील भाव काय?
 

    follow whatsapp