राज्यातील काही जिल्ह्यात कोरडे हवामान, तर दिवाळी सणाच्या तोंडावर 'या' विभागात पावसाचा अलर्ट

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 14 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 14 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार

point

14 ऑक्टोबर रोजी कसं असेल हवामान?

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 14 ऑक्टोबर रोजी राज्यात काही ठिकाणी कोरडे हवामान तर काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. कारण परतीच्या पावसामुळे राज्यात पावसाची शक्यता  नसल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.  तर तापमानात ऑक्टोबर  महिन्यात राज्यातील बहुतांश भागात उष्ण हवामान अपेक्षित असणार आहे. खालीलप्रमाणे एकूण विभागानुसार हवामानाचा अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सातारा हादरला! घरात कोणीच नसताना मुलगी कपडे बदलत होती, घरात नराधम शिरला अन् मुलीच्या डोक्यात घातलं दगडी जातं

कोकण : 

कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी रायगड, रत्नागिरी, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात 14 ऑगस्ट रोजी हवामानाचा अंदाज कोरडा राहणार असल्याची शक्यता आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज असल्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर  या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये कोरड्या वातावरणाची शक्यता आहे. तर अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर सांगलीत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मराठवाडा :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

हे ही वाचा : सोलापूरात पोलीस अंमलदाराचा झोपेत खाटेवरून पडून मृत्यू, कुटुंब पडलं वाऱ्यावर, पंचनाम्यातून काय उलगडलं?

विदर्भ : 

राज्यातील विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांपैकी अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा या जिल्ह्यात हवामानाचा कसलाही अंदाज नाही. तर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

    follow whatsapp