राज्यातील 'या' भागात कोरड्या हवामानाचा अंदाज, सर्वाधिक तापमान कुठे?

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 13 ऑक्टोबर रोजी राज्यात कोरडे हवामानाची शक्यता आहे. कारण परतीच्या पावसामुळे राज्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे, तर तापमानात ऑक्टोबर  महिन्यात राज्यातील बहुतांश भागात उष्ण हवामान अपेक्षित आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 13 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार

point

कशी असेल हवामानाची स्थिती?

Maharashtra Weather : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 13 ऑक्टोबर रोजी राज्यात कोरडे हवामानाची शक्यता आहे. कारण परतीच्या पावसामुळे राज्यात पावसाची शक्यता फारच कमी आहे, तर तापमानात ऑक्टोबर  महिन्यात राज्यातील बहुतांश भागात उष्ण हवामान अपेक्षित आहे. खाली विभागानुसार हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : 'पारध्यांनो इथं कशाला राहता, त्यांनी माझ्या बहिणीचा हात पकडला अन्...' सतीश भोसलेच्या पत्नीनं सांगितली आपबीती

राज्यातील चार प्रमुख विभागांमध्ये - कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ - तापमान सामान्य राहण्याची शक्यता आहे. यापैकी मुंबईमध्ये कमाल तापमान हे 33-35 तर किमान तापमान हे 24-26 राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता नसेल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. 

कोकण : 

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान हे 33-35 तर किमान तापमान हे 25-27 असण्याची असण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईसह आता कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघरमध्ये वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र : 

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर  या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यांपैकी सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे. या भागातील तापमान हे 32-34 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान हे 22-24 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा :

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडं राहिल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

हे ही वाचा : बीड हादरलं! सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला, 15 जणांनी महिलांवर धारधार कोयत्याने रक्तबंबाळ होईपर्यंत...

विदर्भ : 

राज्यातील विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांचा समावेश होतो. या एकूण जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज जारी केला. या विभागात हवामान विभागाने कमाल तापमान हे 34-36 तर किमान तापमान हे 22-24 अंश सेल्सिअस असण्याची हवामान विभागाची शक्यता आहे. 

    follow whatsapp