Maharashtra Weather : राज्यातील 'या' जिल्ह्यांत कोसळणार गारांचा पाऊस, पुढील काही तास महत्त्वाचे

मुंबई तक

• 05:00 AM • 31 Mar 2026

Maharashtra Weather : राज्यातील 18 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास धोक्याचे असणार आहेत. हवामान विभागानुसार, 31 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.  

Maharashtra weather

Maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजला

point

18 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

point

पुढील काही तास धोक्याचे

Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाने हाहाकार माजला आहे. मार्च महिन्यात शेवटच्या दिवशी अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास धोक्याचे असणार आहेत. हवामान विभागानुसार, 31 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात.  

हे वाचलं का?

हे ही वाचा :   पुण्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, गारांमुळे 'या' भागाला शिमल्याचं स्वरुप, Video व्हायरल

कोकण 

कोकण विभागात मुंबई आणि पालघरमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात 31 मार्च रोजी अवकाळी पावसाचा अंदाज आहे. यापैकी पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. कोल्हापूरमध्ये हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी गारांच्या पावसाची शक्यता वर्तवली. 

मराठवाडा 

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह इतर काही जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अंदाज जारी केला. जालना, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट तर, नांदेड, लातूर आणि धाराशिवला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. 

हे ही वाचा :  'बायको म्हणते प्रचंड शारीरिक संबंध कर', नवरा वैतागला अन् थेट...

विदर्भ 

विदर्भ विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांत उष्ण हवामानाची शक्यता जारी केली. तर भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा येथे अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला.