Maharashtra Weather : हवामान विभागाने 15 जुलै रोजी हवामानाचा अंदाज वर्तवलेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD) नुसार हवामान विभागाने मान्सूनची स्थिती दर्शवलेली आहे. ज्यात मान्यूनचा प्रभाव, हवेची गुणवत्ता आणि प्रादेशिक हवामानाबाबतची शक्यता नोंदवली आहे. दरम्यान, राज्यात 15 रोजी हवामान विभागाने नेमकं काय सांगतिलं आहे. हवामानाचा अंदाज कसा असेल आणि हवामानाची एकूण परिस्थिती कशी असेल, याची माहिती पुढीलप्रमाणे दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : देशीसह 'या' किंमतीत रशियन मिळतील...अन् खोली भाडं 500, अखेर पोलिसांकडून पर्दाफाश
हवमान विभागाने कोकणाविषयी काय सांगितलं?
हवामान विभागाने कोकणात मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विशेषकरून रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मान्सूनची स्थिती कायम आहे. तर काही ठिकाणी चक्री वारे वाहण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रातील मान्सून स्थिती
मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर आणि नाशिकमध्ये मध्यम ते जोराचा पाऊस कोसळेल. पुण्यात काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी, असा हवामान विभागाने सल्ला दिला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील मान्सून स्थिती
मराठवाड्यात हलका ते मध्यम विजांच्या गडगडाटासह पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच ढगसदृश पावसाच्या स्थितीचा धोका नसणार आहे. परंतु शेतकऱ्यांनी सतर्क रहावं, असा हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी गोंदिया आणि नागपूरमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे या भागात पावसाचा येलो किंवा रेड अलर्ट जारी केला आहे. अमरावती आणि चंद्रपूरमध्ये मध्यम स्वरुपाचामान्सून असेल.
हेही वाचा : नराधमाने मित्राच्या पत्नीलाही सोडलं नाही, मुंबई पोलीस उपनिरिक्षकाच्या पत्नीला 'त्या' रात्री केली जबरदस्ती
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं
पावसामुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी निचरा व्यवस्था मजबूत करा.
जुलैमध्ये पावसाची स्थिती सुधारत असल्याने पेरणीची घाई टाळावी, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात.
वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडण्याचा धोका असू शकतो, त्यामुळे खबरदारी घ्या.
ADVERTISEMENT
