ADVERTISEMENT
Maharashtra Weather : हवामान विभाग (IMD) नुसार, 21 सप्टेंबर 2025 रोजी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. राज्यात शक्यतो सध्या कोकण भागात पावसाची तीव्रता जाणवत आहे. तर नुकतंच मराठवाड्यातही पूरजन्यस्थिती निर्माण झाली आहे. जाणून घेऊयात राज्यातील 21 सप्टेंबर रोजीचा हवामानाचा एकूण अंदाज जाणून घेऊयात.
हे ही वाचा : गोपीचंद पडळकरांची जीभ छाटणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस, बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक
कोकण विभाग :
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या विभागाचा समावेश होती. याच विभागात हवामान विभागाने रायगड आणि रत्नागिरीत मुसळधार पावसासह हवामान विभागाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्र :
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश होतो. या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा अंदाज जारी केला आहे. या एकूण विभागांत हवामान विभागाने हलक्या पावसाचा अंदाज जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, कोल्हापूर घाटमाथा, सातारा, सांगली या विभागांचा समावेश होतो. यापैकी सर्वत्र पावसाचं वातावरण आहे. पण यातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचे अधिक प्रमाण असेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मराठवाडा :
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, हिंगोली, नांदेड, धाराशिव, अकोला या जिल्ह्याचा समावेश होतो. यापैकी छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, लातूर, धाराशिव येथे हवामान विभागाने वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.
हे ही वाचा : मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी लवकरच खुला होणार ‘हा’ उड्डाणपूल... कुठून कुठपर्यंत असेल रूट? बीएमसीची नवी अपडेट
विदर्भ :
विदर्भात अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी सर्वच ठिकाणी पावसाचा अंदाज आहे,
ADVERTISEMENT
