Maharashtra Weather : गणेशोत्सवाच्या आगमनादिवशी वरुणराजाची दमदार हजेरी, IMD चा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 14 Sep 2026

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती, मात्र आता पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण विभागात पावसाने गणेशोत्सवातच आपली हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा यलो हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. अशातच जाणून घ्या 14 सप्टेंबर 2026 गणेशोत्सव दिनी हवामानाचा एकूण अंदाज. 

maharashtra weather (AI Photo)

maharashtra weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली

point

गणेशोत्सव दिनी हवामानाचा एकूण अंदाज

Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती, मात्र आता पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकण विभागात पावसाने गणेशोत्सवातच आपली हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा यलो हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येते. अशातच जाणून घ्या 14 सप्टेंबर 2026 गणेशोत्सव दिनी हवामानाचा एकूण अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबईत सहा मांजरांसह एका पिल्लाला संपवलं, विखुरलेले आढळले मृतदेह

कोकण 

कोकणातील पालघर आणि ठाणे जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तविलेला आहे. तर मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवविलेली आहे. रत्नागिरीत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

उत्तर महाराष्ट्र 

उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. अहिल्यानगर येथे विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

पश्चिम महाराष्ट्र 

पश्चिम महाराष्ट्रात पुण्यात विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर घाटमाथा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. परभणीत विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे. बीडमध्ये विजांसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे.

हे ही वाचा : वसई-विरारमध्ये आगमनादरम्यान ट्रॉली उलटली, दुर्घटनेत बाप्पांची मूर्ती कोसळली

विदर्भ 

विदर्भात अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तविलेला आहे. यवतमाळ, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांत हवामान विभागाने कोणताही अंदाज वर्तविलेला नाही.