Maharashtra Weather : राज्यात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मान्सून दाखल होण्याची दाट शक्यता आहे, अशातच जाणून घ्या एकूण हवामान विभागाचा अंदाज.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : गडचिरोली: प्रसूतीच्या कळा सोसत होती आई, डॉक्टर नसल्याने माय लेकराचा अंत
कोकण
कोकण विभागातील पालघर, ठाण आणि मुंबई येथे हलका ते मध्यम स्वरुपाची शक्यता वर्तविण्यात आलीये. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र
उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मध्यम स्वरुपाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्र
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलाय. साताऱ्यात हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पुणे, घाटमाथा, कोल्हापर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा यलो अलर्ट आहे.
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड येथे पावसाचा यलो अलर्ट वर्तविण्यात आलाय. धाराशिव, लातूर येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे. हिंगोली आणि बीड जिल्ह्यांत विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा : जालन्यात झोका खेळताना पाचवीच्या मुलाला लागला फास, हृदयद्रावक घटनेत मृत्यू
विदर्भ
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, वर्धा, वाशिम आणि यवतमाळमध्ये हवामान विभागाने कोणताही अलर्ट जारी केला नाही. नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्टची शक्यता वर्तविली आहे.
ADVERTISEMENT












