Maharashtra Weather : राज्यातील काही भागात सध्या ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच तापमनात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये जाणवत असलेला थंडावा काही प्रमाणात कमी झाला आहे. सकाळी आणि रात्री काही भागांमध्ये सौम्य वातावरणाची परिस्थिती आहे. तसेच दिवसा उष्णतेचा काही प्रमाणात त्रास जाणवणार आहे. अशातच 22 जानेवारी रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज पुढीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : KDMC: राज ठाकरेंच्या मनसेने पुन्हा बदलली भूमिका?, ज्यांच्या विरुद्ध लढले त्यांच्यासोबतच गेले सत्तेत...
कोकण :
कोकण विभागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत दिवसभर धुक्यासह अंशत: ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे. तसेच उष्णतेत प्रभाव जाणवण्याची अधिक शक्यता आहे. सकाळच्या सुमारास हलक्या प्रमाणात धुक्यांची चादर पसरण्याची शक्यता आहे. तसेच उकाडा जाणव्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्र :
पश्चिम महाराष्ट्रात तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हवामान मिश्र अनुभवता येईल असा अंदाज आहे. याच विभागातील महत्त्वाचं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जात. याच शहरातील आणि परिसरात सकाळच्या सुमारास धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे. तसेच काही प्रमाणात गारवा देखील जाणवणार आहे.
मराठवाडा :
मराठवाडा विभागातील हवामान कोरडं राहणार आहे. छत्रपती संभाजीनगरात पहाटे धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे. तर दुपारनंतर आकाश निरभ्र आणि स्वच्छ राहिल असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीचा गारवा कमी झाल्याचं जाणवेल.
हे ही वाचा : ठाणे: पहाटे घर सोडल्यानंतर तिघींचा नाही पत्ता; 3 दिवसांपासून बेपत्ता... ठाणे पोलिसांचं पथक लखनऊला रवाना
विदर्भ :
विदर्भात काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. तसेच नागपुरात दिवसभर काही प्रमाणात ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. सकाळी आणि रात्रीच्या सुमारास वातावरण सौम्य राहिल आणि दुपारी उष्णता वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT











