Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात 13 जून रोजी मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज वर्तवला असून याची सविस्तर माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Ahmedabad Air India crash : अहमदाबाद विमान अपघातात मृतांच्या संख्येत वाढ, आजचा आकडा वाचून चक्रावून जाल
कोकणात मुसळधार पाऊस
कोकणातील मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमध्ये 13 जून रोजी मुसळधार पाऊस पडणार आहे. प्रामुख्याने मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस थैमान घालणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पूरजन्य परिस्थिती दर्शवण्यात आली आहे. कोकण किनारपट्टीच्या समुद्र किनारीभागात राहणाऱ्या लोकांना समुद्राच्या लाटांचा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रातील मान्सून अपडेट
मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. तसेच हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह धोधो पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी शेतीच्या पेरणीसाठी तयार राहण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.
मराठवाड्यात पूरपरिस्थिती
तसेच मराठवाड्यात 13 जून रोजी नांदेड, धाराशीव, लातूर आणि बीडमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच तापमानात फारसा बदल होणार नाही. पावसाची तीव्रता वाढल्याने पूरजन्यस्थिती किंवा सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं. स्थानिक प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे.
हेही वाचा : Plane Crash: संपूर्ण विमान जळून राख झालं तरी तो कसा वाचला? बचावलेल्या रमेशचा प्रत्येक शब्द तुमच्या अंगावर आणेल काटा!
विदर्भातील 'या' भागात हलका ते मध्यम पाऊस
विदर्भातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असणार आहे. तर पूर्ण विदर्भात उष्णता कायम राहणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबारमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळणार आहेत. शेतकऱ्यांनी सक्रियतेमुळे पेरणीच्या तयारीसाठी सज्ज रहावे. कोकण आणि मराठवाड्यात पूरजन्य परिस्थितीतील रहिवाशांना सतर्क राहावे. विजांच्या कडकडाट सुरू असताना कोणीही झाडाखाली थांबू नये.
ADVERTISEMENT
