आंदोलनासाठी गेले अन् नियतीचा घाला, बीडच्या आंदोलकाचा हृदय विकाराने मृत्यू

मुंबई तक

• 06:12 PM • 29 Aug 2026

Maratha Protestor Heart Attack : मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतला. या आंदोलनादरम्यान एका आंदोलकाचा हृदय विकाराने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे.

Maratha protestor heart attack 

Maratha protestor heart attack 

Google CTA

बातम्या हायलाइट

point

आंदोलनादरम्यान आंदोलकाचा हृदय विकारा​​​​​​​ने मृत्यू 

point

मुंबईत आंदोलन होणार

Maratha Protestor Heart Attack : रोहिदास हतागळे - मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचा निर्णय घेतला. अंतरवाली सराटीत आंदोलनास सुरूवात करण्यात आली आहे. याचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहेत. मराठा समाजाचा मोठा जनसमुदाय मोठ्या प्रमाणात अंतरवाली सराटीकडे जात आहे. मात्र याचदरम्यान, दुर्दैवी घटना घडल्याचे वृत्त आहे. केज तालुक्यातील एका आंदोलकाचा हृदय विकाराने अंत झाला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : इंस्टाग्रामवर महिलेच्या नावाचं खोटं अकाउंट बनवलं, पतीला अश्लील व्हिडिओ पाठवले

आंदोलनादरम्यान आंदोलकाचा हृदय विकाराने मृत्यू 

मृत व्यक्तीची सुग्रीव बापू शिंदे अशी ओळख समोर आली आहे. जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुग्रीव बापू आंदोलनात सामील होण्यासाठी जात असताना त्यांचा मृत्यू झाला. गेवराई येथे त्यांचे वाहन आले असताना त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने ही घटना घडली. सुग्रीव यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.  

मुंबईत आंदोलन होणार

दरम्यान, मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. हे आदोलन निर्णायक असेल असे त्यांनी सरकारला सांगितलं. एवढंच नाही,तर आम्ही मुंबईमध्ये ध़डकणार असल्याचे देखील ते म्हणाले होते. अशा परिस्थितीत मुंबईत 45 लाख मराठा कार्यतकर्ते दाखल होणार असे ते म्हणाले होते. 

हे ही वाचा : भाजप नेत्याच्या सुनेनं संपवलं जीवन, पतीचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर-जळगाव येथील महामार्ग आडवण्यात आला होता. आंदोलकांनी रस्त्याच्या बेमुदत रस्ता रोकोची बॅनरबाजी केली होती. आंदोलकांनी मंत्र्यांच्या गाडीमागे धावण्याचा प्रयत्न देखील केला होता. यादरम्यान, परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला.