Mathura Train Video : दारूची नशा, व्हिडिओ कॉल…, लोकल थेट चढली प्लॅटफॉर्मवरच

प्रशांत गोमाणे

28 Sep 2023 (अपडेटेड: 28 Sep 2023, 02:59 PM)

मथुरा रेल्वे स्टेशनचे डायरेक्टर संजीव श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरा रेल्वे अपघाताच्या तपासानंतर 5 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एक लोको पायलट आणि 4 टेक्निशियन्सचा समावेश आहे.

mathura train accident cctv footage railway worker drunk and busy video call big revealation

mathura train accident cctv footage railway worker drunk and busy video call big revealation

follow google news

Mathura Train Accident CCTV Footage : उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मथुरा रेल्वे स्टेशनवर (Mathura Railway Station) ईएमयू ट्रेन स्टॉपरला तोडून थेट प्लॅटफॉर्म चढल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. या घटनेचे आता सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमधून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता रेल्वेने त्यांच्या 5 कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास सूरू आहे. (mathura train accident cctv footage railway worker drunk and busy video call big revealation)

हे वाचलं का?

मथुरा रेल्वे स्टेशनचे डायरेक्टर संजीव श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मथुरा रेल्वे अपघाताच्या तपासानंतर 5 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये एक लोको पायलट आणि 4 टेक्निशियन्सचा समावेश आहे. हे सर्व रेल्वे कर्मचारी घटनास्थळी ट्रेनमध्ये उपस्थित होते. त्यांच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेने लोको पायलट गोविंद बिहारी शर्मा व टेक्निकल टीमचे हरभजन सिंह, सचिन, बृजेश कमार आणि कुलदीपचा समावेश आहे. या सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेकडून तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.

हे ही वाचा : Rajasthan : वसुंधरा राजेंना भाजपने शोधला पर्याय! कोण आहेत महाराणी दिया कुमारी?

रेल्वेने दिलेल्या माहितीनूसार, या सर्व कर्मचाऱ्यांचे काम ट्रेनची सेटींग करून तिला ट्रॅकवर पार्क करण्याचे होते. पण हे कर्मचारी कामा दरम्यान मोबाईल चालवत होते. लोको पायलट तर व्हिडिओ कॉलवर व्यस्त होता. तसेच ज्यावेळेस या कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली, त्यावेळेस ते 42 टक्के नशेत आढळले आहेत. या संबंधित अधिकृत रिपोर्ट हाती येणे अद्याप बाकी आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कोणती नशा केली होती, हे स्पष्ट होणार आहे.

नेमकी घटना काय?

गुरूवारी रात्री 10 च्या सुमारास लोकल ट्रेन दिल्लीवरून मथूरा पोहोचली होती. ट्रेन मथुरा स्टेशनवर पोहोचताच सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते. यानंतर ट्रेनला ट्रॅकवर उभी करण्यासाठी स्टेशनवर लोको पायलट आणि कर्मचारी उपस्थित होते. ट्रेनचा चालक गाडीतून उतरताच, लोको पायलट आत शिरला. हा लोको पायलट फोनवर व्हिडिओ कॉलवर व्यस्त होता. या दरम्यान त्याच्याकडून ब्रेक दाबण्याऐवजी एक्सीलेटर दाबला गेला आणि ट्रेन थेट प्लॅटफॉर्मवर चढली होती. या घटनेनंतर एकच खळबळ माजली होती. आता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

    follow whatsapp