'या' तारखेला मान्सून धडकणार; मुंबई, पुण्यासह IMD चा अलर्ट कुठे?

श्रीलंकेच्या आसपास खोळंबलेले मान्सूनचे वारे आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली असून. लवकरच केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या काही भागात मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

03 Jun 2026 (अपडेटेड: 03 Jun 2026, 12:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

'या' तारखेला मान्सून धडकणार

point

मुंबई, पुण्यासह IMD चा अलर्ट कुठे?

Maharashtra Weather : दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकरी आणि नागरिक मान्सूनच्या आगमनाची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. यंदा हवामान खात्याने सुरुवातीला दिलेली मान्सूनच्या आगमनाची तारीख उलटून गेली तरीही पाऊस न आल्याने चिंता वाढली होती. मात्र, आता पुढील 48 तासांत मान्सून दाखल होणार असल्याचं एक मोठं अपडेट समोर आलं आहे. हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, 4 जून 2026 च्या सुमारास नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अत्यंत अनुकूल आहे. श्रीलंकेच्या आसपास खोळंबलेले मान्सूनचे वारे आता पुढे सरकण्यास सुरुवात झाली असून, 4 जूनपर्यंत केरळ, लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या काही भागात मान्सूनचे आगमन अपेक्षित आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता

मान्सूनच्या या प्रगतीचा थेट परिणाम महाराष्ट्रातील वातावरणावर होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, 2 ते 4 जून दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात वाऱ्यांचा कमाल वेग तब्बल 70 किलोमीटर प्रति तास राहू शकतो. विशेषतः मध्य महाराष्ट्राला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता असून, काही भागात वादळी वाऱ्यांसोबतच गारपीट (गारांचा पाऊस) होण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हे ही वाचा : रोहित पवारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, नवी मुंबईत काय घडलं?

मध्य भारतात मुसळधार आणि ऑरेंज अलर्ट

हवामान खात्याने जारी केलेल्या ग्राफिक्सनुसार, देशातील अनेक राज्यांना 2 आणि 3 जून रोजी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर, दक्षिण आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता मध्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने तिथे 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे. तसेच, राजस्थानमध्ये आलेल्या मोठ्या वाळूच्या वादळाची तीव्रता अद्यापही जास्त असून, तिथे 3 जून रोजीही तीव्र वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 2 ते 4 जून दरम्यान जोरदार वादळासह काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे.

हे ही वाचा : निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीतून माघार का घेतली?

दक्षिण, उत्तर आणि पूर्व भारतातील हवामान स्थिती

पुढील 6 ते 7 दिवसांत केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार, तर तामिळनाडू आणि कर्नाटकात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण भारतात 2 ते 6 जून दरम्यान संपूर्ण भागात वादळी वाऱ्यांसह हलका पाऊस पडू शकतो. पूर्व भारताचा विचार केला तर, 2 ते 8 जून दरम्यान अंदमान निकोबार आणि पश्चिम बंगालसह संपूर्ण पूर्व भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची स्थिती राहील. उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारतात म्हणजेच जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि दिल्लीमध्ये 2 ते 6 जून दरम्यान वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.