सासूने दिलं नशेचं औषध अन् बेशुद्ध झाल्यानंतर दीरांकडून घाणेरडं कृत्य... महिलेनं सासरच्यांबद्दल सगळंच सांगितलं

मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यात पीडितेने आपल्या सासरच्या मंडळींवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. सासरच्या लोकांकडून तिचा 9 वर्षांपासून शारीरिक छळ केला जात असून त्यामध्ये महिलेची सासू आणि तिच्या दीरांचा समावेश होता.

सासूने दिलं नशेचं औषध अन् बेशुद्ध झाल्यानंतर दीरांकडून घाणेरडं कृत्य...

सासूने दिलं नशेचं औषध अन् बेशुद्ध झाल्यानंतर दीरांकडून घाणेरडं कृत्य...

मुंबई तक

• 11:06 AM • 02 Aug 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पीडितेचा सासरमध्ये शारीरिक छळ

point

सासू नशेची औषधं द्यायची आणि दीरांकडून घाणेरडं कृत्य...

point

सासरच्या मंडळींविरोधात महिलेनं केली तक्रार

Crime News: मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातून नातेसंबंधांना काळीमा फासणारी एक घटना घडल्याचं समोर आलं आहे. पीडितेने आपल्या सासरच्या मंडळींवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. पीडित महिलेच्या मते, सासरच्या लोकांकडून तिचा 9 वर्षांपासून शारीरिक छळ केला जात होता. यामध्ये महिलेची सासू आणि तिच्या दीरांचा समावेश होता. इतकेच नव्हे, या सगळ्या प्रकाराबद्दल नवऱ्याला माहीत असून देखील तो फक्त तिच्यावर होणारा अत्याचार बघत बसल्याचा पीडितेने आरोप केला आहे.

हे वाचलं का?

लग्नाच्या काही महिन्यांतच शारीरिक शोषण 

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिची सासू तिला नेहमी नशेची औषधं द्यायची. औषधांमुळे तिला गुंगी यायची आणि त्यावेळी बेशुद्ध झाल्यानंतर महिलेचा दीर तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. लग्नाच्या काही महिन्यांतच तिचं शारीरिक शोषण सुरु झाल्याचं पीडितेनं सांगितलं. 

सतत धमक्या दिल्या जात होत्या

तसेच, महिलेसोबत होणाऱ्या या घाणेरड्या कृत्याबद्दल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला माहित असूनही तिची कोणीच मदत केली नसल्याचं पीडितेनं सांगितलं. याउलट, तिने या सगळ्याला विरोध केला असता कुटुंबातील लोकांकडून तिला सतत धमक्या दिल्या जात असल्याचा पीडितेने दावा केला. 

पतीला माहित असून देखील गप्प...

इतकेच नव्हे तर आपल्या पत्नीसोबत असं घाणेरडं कृत्य होत असल्याचा पाहून महिलेच्या पतीने काहीच केलं नाही. याबद्दल माहिती असून देखील तो गप्पच राहिला. खरं तर, तो तिला आर्थिक मदतही करत नव्हता. नवरा बाहेर कामाला असून सुद्धा पीडितेच्या तिच्या खर्चासाठी पैसे दिले जात नव्हते. 

हे ही वाचा: पुणे: फक्त सोशल मीडिया पोस्टवरुन का पेटला मोठा वाद? मुख्यमंत्र्यांनीच सांगितली 'ती' गोष्ट

पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल 

सासरमध्ये वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडितेला तिच्या माहेरी ग्वाल्हेरला जावं लागलं असल्याचं तिने सांगितलं. जर ती पुन्हा तिच्या सासरी गेली तर तिच्या जीवाला धोका असू शकतो, असं पीडिता म्हणाली. या भीतीमुळे तिने ग्वाल्हेर पोलीस स्टेशनमध्ये तिच्या सासरच्या सदस्यांविरोधात तक्रार दाखल केली.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी पीडित महिलेच्या सुरक्षिततेचा विचार करून तिच्या तक्रारीची दखल घेतली आणि झीरो एफआयआर नोंदवण्यात आली. संबंधित महिलेची तक्रार कंपू पोलिस ठाण्यात पाठवण्यात आली असून तपासाची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती आहे. जर चौकशीत त्याच्या आरोपांची पुष्टी झाल्यानंतर संबंधित लोकांवर कठोर कारवाई होणार असल्याचं देखील सांगितलं गेलं आहे. 

हे ही वाचा: पक्षांतरावरुन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्षांना जबर दणका!

पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला या प्रकरणात तिच्या माहेरच्या कुटुंबियांकडून देखील कोणतीच मदत मिळाली नसून तिला न्याय मिळवण्यासाठी ती एकटीच प्रयत्न करत आहे. 

    follow whatsapp