UP News: अलीगढमधील सासू आणि जावयाचे प्रेम प्रकरण सध्या प्रचंड चर्चेत आहे. कारण सासू मुलीच्या लग्नाच्या काही दिवस आधीच आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली होती. आता अशीच एक दुसरी घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. यावेळी सुद्धा एक महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील दुबैलिया भागात घडल्याचं समजतं आहे. पोलिसांनी नातेवाईकांच्या सांगण्यावरून पळून गेलेल्या तरुणाचा आणि महिलेचा तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
मीडिया रिपोर्टनुसार, दुबैलिया मध्ये राहणाऱ्या एका मुलाचं लग्न गोंडा जिल्ह्यात राहणाऱ्या मुलीसोबत चार महिन्यांआधी ठरलं होतं. यादरम्यान, मुलगा आणि मुलीमध्ये फोनवर बोलणं होण्यास सुरूवात झाली. मात्र, याच काळात जावयाचं त्याच्या होणाऱ्या सासूसोबत सुद्धा फोनवर बोलणं वाढू लागलं. सुरूवातीला, घरातील लोकांना याबद्दल काहीच वाटलं नाही. परंतु कालांतराने त्यांच्यातील बोलणं वाढल्यानंतर आणि सासूचं वागणं बदलल्यानंतर घरच्यांना संशय येऊ लागला.
कुटुंबीयांचं मत
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा मुलीच्या कुटुंबाने ठरलेलं लग्न मोडलं, यानंतर मुलीचे लग्न दुसऱ्या ठिकाणी ठरवण्यात आले. लग्नाची तारीख मे महिन्यात निश्चित करण्यात आली. पण असं असताना मुलगा त्याच्या होणाऱ्या सासू सोबत लग्नाच्या तीन दिवस आधीच पळून गेला.
हे ही वाचा: ज्यानं पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली, तोच निघाला खूनी; 3 महिन्यांनी 300 किमीदूर सापडला मृतदेह, प्रकरण काय?
पोलिसांनी सुरू केला तपास
मुलीच्या कुटुंबीयांनी स्वतःहून महिलेचा शोध घेतला. परंतु कोणताही सुगावा न लागल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलीस त्या तरुणाच्या घरीही पोहोचले पण तो तिथेही सापडला नाही. दोघांचाही शोध सुरू असून लवकरच त्यांना शोधण्यात येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्या तरुणाचा आणि महिलेचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. मोबाइल लोकेशन्स तपासले जात आहेत आणि संभाव्य लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत.
हे ही वाचा: आईस्क्रीम खाताना कॅफे मालकावर हल्ला, धडाधड गोळ्या घालून संपवलं, तपासातून उघड झालं धक्कादायक प्रकरण
वस्तीमधील ही घटना अलिगढमध्ये घडलेल्या घटनेसारखीच आहे. अलीगढ प्रकरणाप्रमाणे या घटनेबद्दल स्थानिक लोकांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. लवकरच हे प्रकरण उलगडेल आणि दोघंही ताब्यात येतील असं पोलिसांचं म्हणणं आहे. सध्या दोघांचेही मोबाइल नंबर बंद असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे त्यांचे लोकेशन ट्रेस करण्यात अडचण येत आहे.
ADVERTISEMENT
