मुंबईची खबर : 24 तासात मुंबईत कोसळली 523 झाडं, काँक्रिटीकरणचा फटका बसतोय का?

मुस्तफा शेख

07 Jul 2026 (अपडेटेड: 07 Jul 2026, 04:03 PM)

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अवघ्या 24 तासांत 523 झाडं कोसळली आहेत. याला कारणीभूत असलेली विविध कारणं आता समोर आली आहेत. जाणून घ्या सविस्तर.

Mumbai News

Mumbai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : 24 तासात मुंबईत कोसळली 523 झाडं,

point

काँक्रिटीकरणचा फटका बसतोय का?

Mumbai News : मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडं कोसळण्याच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. अवघ्या 24 तासांत झाडे कोसळण्याच्या 523 घटना समोर आल्या असून, यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. आता या अपघातांबाबत काँक्रीटचे रस्ते, झाडांची चुकीच्या पद्धतीने केलेली छाटणी आणि खराब हवामानाची भूमिका यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वस्तुस्थिती जाणून घेतली असता असे समजले की, झाडे काँक्रीटच्या सीमारेषेने (बाउंड्रीने) वेढलेली आहेत. यासोबतच झाडांची चुकीच्या पद्धतीने छाटणी केल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतुलन निर्माण झाले आहे. रस्त्यांच्या दिशेने येणाऱ्या फांद्या कापल्या जातात, ज्यामुळे वेगवान वारा सुटल्यावर झाडे अस्थिर होतात.

हे वाचलं का?

24 तासात 523 झाडं पडली

रविवारी 24 तासांत म्हणजेच 5 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 6 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत शहर, तसेच पूर्व आणि पश्चिम उपनगर परिसरात झाडे पडण्याच्या 523 घटना समोर आल्या. या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 8 जण जखमी झाले. एका आठवड्यामध्ये झाडे पडण्याच्या या घटनांमध्ये एकूण तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईकर नागरिक हा सवाल विचारत आहेत की, इतक्या मोठ्या प्रमाणावर झाडे कोसळण्यामागे निष्काळजीपणा कारणीभूत आहे की ही एखादी नैसर्गिक आपत्ती आहे. वास्तविक पाहता, मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटना नेहमीच घडत आल्या आहेत, परंतु त्यांच्या संख्येत आता प्रचंड वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीने झाडे पडण्याच्या या वाढत्या घटनांसाठी वेगवान वाऱ्याला जबाबदार धरले आहे. रविवारी वाऱ्याचा वेग ताशी 72-79 किलोमीटर होता, जो मान्सून दरम्यान सामान्यतः वाहणाऱ्या वाऱ्याच्या सरासरी वेगापेक्षा तीन पटीने जास्त आहे.

हे ही वाचा : बायकोचा राग मुलीवर काढला, नराधम बापाने 11 महिन्यांच्या लेकीसोबत काय केलं?

इतकी झाडं का पडताहेत?

परंतु तज्ज्ञांचे मानले तर, अलीकडच्या काळात झाडे कोसळण्याच्या अनेक घटनांनी बीएमसीच्या मोठ्या 'रोड काँक्रिटायझेशन' (रस्ते काँक्रिटीकरण) प्रकल्पावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कारण झाडे पडून झालेल्या तीन मृत्यूंपैकी दोन मृत्यू अशा रस्त्यांवर झाले, जिथे नुकतेच काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या रोड काँक्रिटायझेशन प्रकल्पाची सुरुवात जानेवारी 2023 मध्ये करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे भूमिपूजन केले होते. तेव्हापासून बीएमसीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की झाडे पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वर्ष 2023 मध्ये 687, 2024 मध्ये 653 आणि 2025 मध्ये 855 घटनांची नोंद झाली. 2023 ते 5 जुलै 2026 दरम्यान झाडे पडण्याच्या घटनांमध्ये सुमारे 11 लोकांचा मृत्यू झाला, तर 2020 ते 2022 दरम्यान चार मृत्यूंची नोंद झाली होती.

हे ही वाचा : सातारा जिल्ह्यात जलप्रलय, तब्बल 116 गावांचा संपर्क तुटला, शेकडो एकर शेती पाण्याखाली!

वृक्षतज्ज्ञांनी काय सांगतिलं?

मुंबईत 5 हजार झाडांचे वैज्ञानिक सर्वेक्षण करत असलेले 'आर्बरिस्ट' म्हणजेच वृक्षतज्ज्ञ वैभव राजे म्हणाले, "सिमेंट आणि झाड एकत्र राहू शकत नाहीत. झाडांच्या मुळांना मातीमध्ये घट्ट रुजण्याची गरज असते. जेव्हा मुळांचा भाग काँक्रिटने झाकला जातो, तेव्हा मुळे हळूहळू आपली पकड गमावून बसतात आणि झाडाचा पाया कमकुवत होतो. परिणामी, थोड्याशा मुसळधार पावसानंतरही झाडे कोसळू शकतात. झाडांची चुकीच्या पद्धतीने छाटणी केल्यामुळे देखील ती अस्थिर होतात आणि पडू शकतात. यासोबतच, सडणे हे देखील एक कारण आहे, ज्यामुळे मजबूत दिसणारी झाडेही उन्मळून पडतात. म्हणूनच आम्ही धोक्याचे मूल्यांकन करण्यासाठी 'लिदार' (LIDAR) आणि 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. झाडांच्या धोक्याचे मूल्यांकन केल्याने त्यांच्या पडण्याचा धोका कमी होतो."

हे ही वाचा : पोलीस खात्याला काळिमा, अल्पवयीन मुलीवर पीएसआयने केला बलात्कार

'झाडं सडणे हे मुख्य कारण'

जेव्हा बीएमसीच्या मार्केट्स अँड गार्डन्स कमिटीच्या अध्यक्षा हेतल गाला यांना विचारण्यात आले की, ट्री अथॉरिटीने ऑक्टोबर 2023 ते मार्च 2026 दरम्यान झाडांच्या मुळांना नुकसान पोहोचवल्याबद्दल बीएमसीच्या रोड्स डिपार्टमेंट आणि युटिलिटी एजन्सींना 428 नोटिसा जारी केल्या आहेत, तेव्हा त्यांनी सांगितले, "हे खरे आहे की झाडे पडण्याच्या घटना वाढल्या आहेत, परंतु झाडे वेगवान वारा आणि मुसळधार पावसामुळे पडत आहेत. जिथे काँक्रिटचे काम सुरू आहे, तिथेच फक्त झाडे पडत आहेत असे अजिबात नाही. झाडे सडणे हे त्यांच्या पडण्यामागच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक आहे, म्हणूनच अशा झाडांची व्यवस्थित तपासणी करून त्यांची ओळख पटवली पाहिजे आणि त्यांच्यावर उपचार केले पाहिजेत."