नागपूर: परीक्षेच्या तासाभरापूर्वी पेपर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आला... 12 वीचे फिजिक्स-केमिस्ट्रीचे पेपर फुटले!

बारावीच्या परीक्षेत पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे नागपुरातील असून बारावीच्या विज्ञान शाखेचे 2 विषयांचे पेपर फुटल्याचं वृत्त समोर आलं आहे.

तासाभरापूर्वी पेपर व्हॉट्सअॅप ग्रुपवर आला...

तासाभरापूर्वी पेपर व्हॉट्सअॅप ग्रुपवर आला...

योगेश पांडे

• 02:01 PM • 21 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

परीक्षेच्या तासाभरापूर्वी पेपर व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आला...

point

नागपुरात 12 वीचे फिजिक्स-केमिस्ट्रीचे पेपर फुटले!

HSC Paper leak: बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरळीत आणि गैरप्रकारमुक्त पार पाडण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना जाहीर केल्या होत्या. मात्र, यावेळी बारावीच्या परीक्षेत पेपरफुटीचं प्रकरण समोर आल्याची बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकरण हे नागपुरातील असून बारावीच्या विज्ञान शाखेचे 2 विषयांचे पेपर फुटल्याचं वृत्त समोर आलं आहे. याप्रकरणी नागपुरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय? 

हे वाचलं का?

परीक्षेपूर्वीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर पेपर आला... 

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता. मात्र, परीक्षेच्या आधीच केमिस्ट्री विषयाचा पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर आला होता. सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावरील ही घटना असून व्हाट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. 

सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर बारावीच्या विज्ञान शाखेचा पेपर सुरू असताना एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर, केंद्रावरील एका शिक्षिकेच्या माध्यमातून संबंधित विद्यार्थीनीची झडती घेण्यात आली आणि त्यावेळी तिच्याकडे एक स्मार्टफोन सापडला. मुलीकडून तो स्मार्टफोन जप्त करण्यात आला आणि त्याची तपासणी केली असता एका व्हाट्सअप ग्रुपवर परीक्षेच्या तासाभरापूर्वी पेपर आल्याची माहिती मिळाली. 

हे ही वाचा: Govt Job: पदवीधरांसाठी भारतीय निवडणूक आयोगात भरती! पगार तर... कुठे आणि कधीपर्यंत कराल अर्ज?

त्यानंतर, केंद्रप्रमुखांनी या प्रकरणाची माहिती सदर पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी तपास करून याबाबत गुन्हा दाखल केला. विद्यार्थीनीच्या स्मार्टफोनमध्ये व्हाट्सअपवर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आल्याची माहिती आहे. त्या ग्रुपमधील दोन्ही विद्यार्थीनींची चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच, ग्रुपमधील इतर 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पेपर सोडवत होते. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

    follow whatsapp