नांदेड : मुलाने 16 वर्षांनंतर घेतला बापाच्या हत्येचा बदला, आरोपी जामीनावर सुटताच शस्त्रांनी वार करुन सूड उगवला

Nanded Crime : नांदेड हादरलं, मुलाने 16 वर्षांनंतर घेतला बापाच्या हत्येचा बदला, आरोपी जामीनावर सुटताच तरुणाने सूड उगवला

Nanded Crime

Nanded Crime

मुंबई तक

18 Nov 2025 (अपडेटेड: 18 Nov 2025, 12:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

नांदेड : मुलाने 16 वर्षांनंतर घेतला बापाच्या हत्येचा बदला

point

आरोपी जामीनावर सुटताच शस्त्रांनी वार करुन सूड उगवला

Nanded Crime : नांदेडजवळील बळीरामपूर (पंचशीलनगर) परिसरात शुक्रवारी संध्याकाळी जुन्या वैरातून झालेल्या खूनामुळे संपूर्ण परिसर हादरलाय. तब्बल 16 वर्षांपासून मनात पेटत ठेवलेल्या सूडाच्या भावनेने एका 20 वर्षीय तरुणाने दोन साथीदारांसह वडिलांच्या मारेकऱ्याची निर्घृण हत्या केली. नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या प्रकरणाचा तपास उलगडत तिघांना बेड्या ठोकल्या. घटनेतील मृत व्यक्तीचे नाव राष्ट्रपाल तुकाराम कपाळे (39, रा. पंचशीलनगर) असे असून, 2009 मध्ये झालेल्या राजेंद्र गवळे यांच्या खून प्रकरणात तो आरोपी होता. पुढे काही वर्षांनी राष्ट्रपाल कपाळे याला जामीन मिळाला होता. तेव्हापासून तो ऑटो चालविणे आणि किराणा दुकान चालवून उदरनिर्वाह करत होता.

हे वाचलं का?

मुलगा वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यसाठी शोधत होता संधी 

दरम्यान, राजेंद्र गवळे यांचा मुलगा नागेश (20) आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी संधी शोधत होता. शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपाल कपाळे दुकानात असल्याची माहिती मिळताच नागेशने दोन मित्रांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. तिघांनी मिळून तीक्ष्ण शस्त्रांनी कपाळे यांच्यावर वार करत त्यांची जागीच हत्या केली आणि पळ काढला. घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला आरोपींचा ठावठिकाणा न मिळाल्याने अडचणी निर्माण झाल्या. मात्र पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या तपासातून अवघ्या तीन तासांत तिन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा : मुंबई : शाळेच्या कॅन्टीनमध्ये समोसा तळण्यासाठी वापरलेल्या तेलात चुकून कापूर पडला, 20 विद्यार्थ्यांना विषबाधा

अटक झालेले आरोपी :

नागेश राजेंद्र गवळे (20, रा. शाहूनगर, वाघाळा)

अभिजीत राणू गजभारे (20, रा. धनेगाव)

लकी राजकुमार पारखे (19, रा. गौतमनगर, किल्ला रोड)

पोलीस तपासात तिघांनी मिळून वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच राष्ट्रपाल कपाळे यांना ठार केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नांदेडमध्ये जुन्या वैरातून पुन्हा उसळलेल्या या रक्तरंजीत घटनेमुळे ग्रामस्थांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई: शाळेत सोडताना व्हॅन चालकाचा विद्यार्थीनींवर विनयभंग! पीडितेने आईला सगळंच सांगितलं अन्...

 

    follow whatsapp