Govt Job: टेक्निकल क्षेत्राशी संबंधित तसेच ITI (आयटीआय) तरुणांना सरकारी नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) कडून नव्या भरतीचं नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं आहे. यावेळी BHEL कडून एकूण 515 पदांसाठी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये फिटर, वेल्डर, टर्नर, मॅकेनिस्ट, इलेक्ट्रीशिअन, इलेक्ट्रॉनिक्स मॅकेनिक आणि फाउंड्री सारख्या पदांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
या भरतीसाठी ऑनसाइन अर्जाची प्रक्रिया 16 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार BHEL च्या bhel.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. भरतीशी संबंधित महत्त्वाच्या अटी आणि प्रक्रिया शॉर्ट नोटिफिकेशनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या आहेत.
पात्रता
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI), नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट (NTC) आणि नॅशनल अप्रेन्टिसशिप सर्टिफिकेट (NAC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सामान्य (Open) आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत आणि एससी (SC)/एसटी (ST) प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 55 टक्के गुण आवश्यक आहेत.
हे ही वाचा: सातारा: गावातील तरुणासोबतच अनैतिक संबंधातून, प्रेमविवाह केलेल्या महिलेच्या खुनाचं हादरवून टाकणारं सत्य आलं समोर
वयोमर्यादा
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे, तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे, एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे आणि अपंग उमेदवारांना 10 वर्षे सूट मिळेल.
टेक्निकल पदांसाठी सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. BHEL सारख्या प्रतिष्ठित कंपनीत काम केल्याने करिअरमध्ये वाढ आणि प्रशिक्षणाच्या उत्तम संधी उपलब्ध होतात.
हे ही वाचा: पारंपारिक नृत्य कला केंद्रात अश्लील पार्टी! संघटनेच्या कार्यकर्त्याने बनवला व्हिडीओ अन्...
अर्जाची प्रक्रिया
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम BHEL च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर "Apprentice Recruitment 2025" लिंकवर क्लिक करून नवं रजिस्ट्रेशन करा.
रजिस्ट्रेशन केल्यानंतर आवश्यक माहिती भरून डॉक्यूमेंट्स अपलोड करा.
अर्ज सबमिट केल्यानंतर प्रिंटआउट काढून सुरक्षितरित्या ठेवा.
ADVERTISEMENT
