CBI Recruitment 2025: 7 वी उत्तीर्ण ते ग्रॅज्युएट अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) कडून फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि वॉचमन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार centralbank.bank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. तसेच, 18 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या पदांसाठी निघाली भरती
1. फॅकल्टी: 02
2. ऑफिस असिस्टंट: 02
3. अटेंडर: 01
4. वॉचमन/ गार्डनर: 01
काय आहे पात्रता?
ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया सामाजिक उत्थान अवम शिक्षण संस्था (CBI-SUAPS) साठी केली जाणार आहे. वॉचमन/ गार्डनर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 7 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, अटेंडर पदासाठी 10 वी उत्तीर्ण पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
ऑफिस असिस्टंट पदांसाठी ग्रॅज्युएट, बीएसडब्ल्यू/ बी.ए/ बी.कॉम आणि फॅकल्टी पदांसाठी कोणत्याही विषयात ग्रॅज्युएट/ पोस्ट ग्रेजुएट, MSW/ MA/ सोशियोलॉजी/ बी.एससी/ बीए बीएड अशी पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, संबंधित क्षेत्रात कार्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. उमेदवार भरतीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पात्रता तपासू शकतात.
वयोमर्यादा
या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवाराचं किमान वय 22 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे असणं गरजेचं आहे. याशिवाय, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारण्यात येणार नाही.
हे ही वाचा: बाल संरक्षण गृहात 10 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार! आईने थेट घेतली पोलिसात धाव...
तसेच, भरतीमध्ये नियुक्त झालेल्या उमेदवारांना पदांनुसार वेतन दिलं जाईल.
- फॅकल्टी: 30,000 रुपये दरमहा
- ऑफिस असिस्टंट: 20,000 रुपये दरमहा
- अटेंडेंट: 14,000 रुपये दरमहा
- वॉचमन/ गार्डनर: 12,000 रुपये दरमहा
उमेदवारांनी केलेल्या अर्जांच्या आधारे, शॉर्टलिस्टिंग केली जाईल. त्यानंतर, निवड झालेल्या उमेदवारांना पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
हे ही वाचा: सोशल मीडियावर महिला असल्याचं भासवून महिलांशी मैत्री... नंतर, प्रायव्हेट फोटो आणि व्हिडीओ मिळवले अन्...
कसा कराल अर्ज?
1. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी नोटिफिकेशनच्या ANNEXURE-I मधून अर्जाचं फॉर्मेट डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट काढून घ्या.
2. त्यामध्ये तुमचं नाव, पत्ता, प्रवर्ग, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, लिंग, जात प्रवर्ग, मूळ पत्ता, आई-वडिलांचं नाव अशी आवश्यक माहिती भरा.
3. त्यानंतर, शैक्षणिक पात्रता, तसेच कार्याचा अनुभव असल्यास त्यासंबंधी डिटेल्स आणि डिक्लेरेशनवर फोटोसह सही करून सर्व डॉक्यूमेंट्स बँकेत पाठवा.
4. रीजनल ऑफिस, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, धनजल कॉम्प्लेक्स सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज जवळ, अंबिकापूर, सुरगुजा, छत्तीसगड-497001 या पत्त्यावर उमेदवारांनी अर्ज पाठवा.
ADVERTISEMENT
